शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात प्लॉट, फ्लॅट खरेदी करणे झाले अधिक महाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 17:55 IST

शहराच्या मध्यवर्ती भागात घरांच्या किमती वाढणार : जमीन महाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने तीन वर्षांनंतर रेडिरेकनर दरात वाढ केली आहे. नागपूर शहराच्या हद्दीत हा दर ४.२३ टक्के आणि महानगर विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) क्षेत्रात ६.६० टक्के वाढविण्यात आला आहे. त्यामुळे प्लॉटधारकांना प्लॉट किंवा फ्लॅटच्या रजिस्ट्रीसाठी अधिक मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. यामुळे सरकारची तिजोरी भरेल. मात्र, वाढलेल्या रेडिरेकनरमुळे विकासक काहीसे चिंतेत आहेत.

गत दशकभरात नागपूर शहराचा चौफेर विस्तार झाला. शहराच्या मध्यवर्ती भागात प्लॉट आणि फ्लॅटच्या किमती आधीच आवाक्याबाहेर असल्याने सामान्य नागरिकांनी आऊटर नागपूरमध्ये घराचे स्वप्न रंगविले. मात्र, आता वाढीव रेडिरेकनरमुळे आऊटर नागपूरमध्येही प्लॉट किंवा प्लॅटची खरेदी करताना सामान्यांच्या खिशाला निश्चितच कात्री लागणार आहे. रेडिरेकनर दरावर या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. राज्य सरकार दरवर्षी मालमत्तेचा बाजारभाव लक्षात घेऊन रेडिरेकनर दर निश्चित करते. हा दर नवीन आर्थिक वर्षात लागू होतो. राज्य सरकारने सोमवारी रात्री २०२५-२६ या वर्षासाठी नवीन रेडिरेकनर दर जाहीर केले. याचा महानगरपालिका क्षेत्रावर काहीशा परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; परंतु ग्रामीण भागात जमिनीचा दर जास्त असेल. शहरातील वर्धा रोड, सेंट्रल बाजार रोड आणि रामदासपेठसारख्या भागात जमिनीचे दर आधीच जास्त आहेत. येथे कोणताही परिणाम होणार नाही; परंतु ग्रामीण भागात जमिनीचे दर वाढतील. शहरालगतच्या भागात जमीन महाग होण्याची शक्यता आहे. दरवाढीचा ग्रामीण भागात रिअल इस्टेट व्यवसायावर विपरीत परिणाम होईल. अनेक क्षेत्रांमध्ये रेडिरेकनर आणि बाजारभावांवर कोणताही लक्षणीय परिणाम होणार नाही, असे काहींचे मत आहे.

रेडिरेकनर रेट म्हणजे काय?रेडिरेकनर रेट म्हणजे जमिनीची सरकारी किंमत. अनेक वेळा या किमतीच्या आधारे रजिस्ट्री होते. अशा परिस्थितीत रेडिरेकनर रेट वाढल्याने,रजिस्ट्रीचा खर्च स्वाभाविकपणे वाढतो. शिवाय जमिनीची किंमतही वाढते. यापूर्वी सरकारने रेडिरेकनराच्या दरात २०२२ मध्ये वाढ केली होती. त्यापूर्वी २०१८ मध्ये वाढ केली होती. कोविड काळात हा दर तसाच ठेवण्यात आला होता.

"तीन वर्षानंतर रेडिरेकनरचे दर वाढले आहेत. फ्लॅट, प्लॉट वा जमिनीच्या किमती आधीच वाढल्या आहेत. तसे पाहता महागाई दराच्या तुलनेत रेडिरेकनरची दरवाढ कमीच आहे. त्याचा या क्षेत्रावर काहीही परिणाम होणार नाही."- गौरव अगरवाला, अध्यक्ष, क्रेडाई नागपूर मेट्रो.

"वाढीव रेडिरेकनर दराचा बांधकाम क्षेत्रावर फारसा परिणाम होणार नाही; परंतु राज्य सरकारने एक वर्ष दरवाढ करायला नको होती. सध्या ज्या प्रकारे जमीन आणि साहित्याच्या किमती वाढल्या, त्या प्रमाणात फ्लॅटचे दर वाढले नाहीत."- प्रशांत सरोदे, माजी अध्यक्ष, क्रेडाई महाराष्ट्र मेट्रो.

टॅग्स :nagpurनागपूर