शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात व्यापाऱ्याने घेतली उड्डाण पुलावरून उडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:01 IST

इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या एका वितरकाने आर्थिक कोंडीमुळे उड्डाणपुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास शहीद गोवारी आदिवासी उड्डाणपुलावर लोकमत चौकाजवळ हा थरारक प्रकार घडला

ठळक मुद्देव्यवसायात नुकसान : आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या एका वितरकाने आर्थिक कोंडीमुळे उड्डाणपुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास शहीद गोवारी आदिवासी उड्डाणपुलावर लोकमत चौकाजवळ हा थरारक प्रकार घडला.शिरीष लक्ष्मणराव मोघे (वय ५१) असे मृताचे नाव आहे. ते पांडे लेआऊट खामला येथील गणेशपौर्णिमा अपार्टमेंटमध्ये राहत होते. मोघे टीव्ही, फ्रीज आणि अन्य विजेवर चालणाऱ्या उपकरणांचे वितरक होते. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना गेल्या काही दिवसांपासून व्यवसायात मोठे नुकसान झाले. त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते. या पार्श्वभूमीवर ते त्यांची कार क्रमांक एमएच ३१/ सीएस ७४३६ ने झिरो माईलकडून शहीद गोवारी आदिवासी उड्डाणपुलावर चढले. त्यांनी लोकमत चौकाजवळ आपली कार उभी केली आणि कठड्यावर चढून त्यांनी पुलावरून खाली उडी घेतली. ते खाली रक्ताच्या थारोळ्यात पडले. यावेळी प्रत्यक्षदर्शीनी आरडाओरड केली. लगेच पोलिसांना कळविण्यात आले. काही वेळेतच गस्तीवरील पोलीस वाहन पोहचले. मोघेंना उचलून धंतोलीतील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. धंतोलीच्या उपनिरीक्षक सरिता यादव आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचल्या. कारमधील कागदपत्रांवरून ती शिरीष मोघे यांच्या नावे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या परिवारातील सदस्यांसोबत संपर्क केला. दरम्यान, उपचार सुरू असताना आज पहाटे ४ च्या सुमारास मोघे यांनी प्राण सोडला. त्यांचे बंधू श्रीकांत मोघे यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर