शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

सट्टेबाजीत व्यापाऱ्याची कोंडी !

By admin | Updated: September 22, 2016 02:50 IST

क्रिकेट सट्ट्याच्या वसुलीसाठी चादर व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली.

त्रस्त होऊन घेतले विष वसुलीसाठी अपहरणही चार आरोपींना अटकनागपूर : क्रिकेट सट्ट्याच्या वसुलीसाठी चादर व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीने दुखावलेल्या व्यापाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. १७ सप्टेंबर रोजी रात्री घडलेल्या या घटनेची तक्रार दोन दिवसांनंतरही दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे व्यापारीही हादरले आहेत. लकडगंज पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. यात महेश अग्रवाल, नीरज खंडेलवाल, हरीश कोठारी आणि मितेश ठक्कर सहभागी आहे. सूर्यनगर कळमना येथील ३८ वर्षीय बंटी रामदत्त अग्रवाल यांचे गांधीबागेत किराणा दुकान आहे. ते १७ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता दुकान बंद करून घरी जात होते. त्याचवेळी बंटीला महेश अग्रवालने फोन करून नेहरू पुतळा चौकात भेटायला बोलावले. महेश फायनान्सचे काम करतो. त्याचे जागनाथ बुधवारी येथे कार्यालय आहे. तो ओळखीचाच असल्याने बंटी नेहरू पुतळा चौकात पोहोचला. तिथे महेशसोबत इतरही दोन आरोपी होते. ते बंटीला घेऊन नीरज खंडेलवालच्या कार्यालयात गेले. तिथे त्याला क्रिकेट सट्ट्यातील थकीत रुपये परत मागितले.कार्यालयातच त्याला बंद करून बेदम मारहाण केली. रुपये परत न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तीन तास मारहाण केल्यानंतर आरोपींनी बंटीला त्याच्या सूर्यनगर येथील घराजवळ सोडले. बंटी घरी परत न आल्याने कुटुंबीय अगोदरच चिंतेत होते. घाबरलेला बंटी घरी आल्यावर रडू लागला. त्याची आपबिती ऐकल्यावर घरच्यांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला. सकाळी उठल्यावर या विषयावर बोलू असेही सांगितले. सकाळी घरच्यांना बंटी कुठेही आढळून आला नाही. खूप शोधाशोध केली तरीही तो कुठेही आढळला नाही. त्यामुळे १८ सप्टेंबर रोजी कुटुंबीय कळमना पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी त्यांना लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. कुटुंबीय सायंकाळी लकडगंज पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे त्यांना अगोदर कळमना पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यास सांगण्यात आले. या धावपळीदरम्यानच १८ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता एका ओळखीच्या व्यक्तीला बंटी गांधीबाग येथील दुकानाजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कुटुंबीयांनी लगेच घटनास्थळी पोहोचून त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती अतिशय नाजूक असल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. महेशच्या कुटुंबीयांनी १९ सप्टेंबर रोजी लकडगंज पोलीस, पोलीस आयुक्त कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालयात या प्रकरणाची तक्रार दाखल केली. या आधारावर २० सप्टेंबर रोजी लकडगंज पोलिसांनी अपहरण, मारहाण, धमकावणे आदीचा गुन्हा दाखल केला. आरोपींच्या अटकेची माहिती होताच बुधवारी सकाळीच लकडगंज पोलीस ठाण्यात गर्दी झाली. पोलिसांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वादाचे मुख्य कारण हरीश कोठारी असल्याचे सांगितले जाते. बंटीने क्रिकेट सट्टेबाजीमध्ये ५० लाख रुपयापेक्षा अधिक रुपये हारले होते. बुकीने हरीशला त्याच्या वसुलीचे काम सोपविले होते. हरीशने महेश अग्रवाल, नीरज खंडेलवाल आणि मितेश ठक्करच्या मदतीने बंटीला धडा शिकवण्याची योजना आखली. त्याने यापूर्वीसुद्धा गुन्हेगारांच्या मदतीने अनेक लोकांकडून वसुली केली होती. त्यामुळे बंटीसुद्धा रुपये परत करेल याचा त्याला विश्वास होता. परंतु ही रक्कम परत करणे बंटीच्या आवाक्यात नव्हते. आरोपींच्या दहशतीमुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)यापूर्वीही घडल्या अशा घटना वसुलीसाठी गुन्हेगारांचा वापर करण्यात आल्याची ही दुसरी घटना आहे. दहा महिन्यांपूर्वी सीताबर्डी येथील माजी रणजी खेळाडूच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. पीडिताने आपसात प्रकरण मिटविले. या प्रकरणातील सहभागी आरोपींच्या विरुद्ध महिनाभरापूर्वीच सट्टेबाजी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डब्बा प्रकरणाशी तार या प्रकरणातील आरोपीचे तार डब्बा प्रकरणाशी सुद्धा जुळलेले आहेत. शहर पोलीस डब्बा प्रकरणाचा तपास करीत आहे. ही चौकशी सुद्धा संशयाच्या घेऱ्यात आहे. यादरम्यान आरोपींनी व्यापाऱ्याचे अपहरण करणे आणि आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने पोलिसांच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण झाले आहे. डब्बा प्रकरणातील आरोपी दिनेश गोखलानी याचा सुद्धा एका महिन्यापूर्वी हुडकेश्वर येथे संशयास्पद मृत्यू झाला. ती आत्महत्या असल्याचे सांगितले जात आहे.