शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातल्या डेगमा गावात पाच वर्षांनी बससेवा पुन्हा सुरू; ग्रामस्थांचा आनंदोत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 10:43 IST

पाच वर्षांनंतर गावात एसटी बस पोहोचली अन् ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले. हे वास्तव आहे हिंगणा तालुक्यातील डेगमा (बु.) या गावातील.

ठळक मुद्देपुरेसे प्रवासी मिळत नसल्याने बससेवा बंद होती

आॅनलाईन लोकमतनागपूर: गावात येणारी राज्य परिवहन महामंडळाची बस अचानक पाच वर्षांपूर्वी बंद झाली. त्यामुळे गावातून बाहेरगावी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच इतर कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत. ही बाब लक्षात घेता बस सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली. अखेर पाच वर्षांनंतर गावात एसटी बस पोहोचली अन् ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले. हे वास्तव आहे हिंगणा तालुक्यातील डेगमा (बु.) या गावातील.डेगमा येथे साधारणत: पाच वर्षांपूर्वीपर्यंत एसटी महामंडळाची बस येत होती. मात्र प्रवासी पुरेसे मिळत नसल्याने तोट्यात असलेली बसफेरी एसटी महामंडळाने बंद केली. परिणामी एसटी बसफेरी बंद होताच विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांना इतर कामासाठी बाहेरगावी जाण्यासाठी पायपीट करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यासाठी खासगी वाहनांचा आधारही घेतला जात.दुसरीकडे एसटी बसफेरी बंद होताच या भागात अवैध प्रवासी वाहतुकीला सुगीचे दिवस आले. गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी नागरिकांना बऱ्याचदा कितीतरी वेळ बसून राहावे लागत अन्यथा पायीवारी करावी लागत.ही अडचण लक्षात घेता नागरिकांनी बसफेरी पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. त्या मागणीबाबत जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे यांनी एसटी महामंडळाशी पत्रव्यवहार केला.त्या मागणीचा पाठपुरावा केला. त्यानंतर अखेर सोमवार (दि. ३०)पासून बसफेरी सुरू करण्यात आली. गावात सोमवारी बसफेरी पोहोचताच ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. सकाळी १० व सायंकाळी ५ वाजता अशा दोन बसफेऱ्या डेगमासाठी सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.डेगमा मार्गावर कोकर्डी, माथनी ही गावे असून बसफेरी सुरू झाल्याने डेगमासोबतच या दोन्ही गावातील विद्यार्थ्यांना, नागरिकांना फायदा होईल. त्यामुळे प्रत्येक बसफेरीसाठी आवश्यक अशी प्रवासीसंख्या मिळून बसफेरी नियमित सुरू राहील, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)

तर बसफेरी सुरू राहील!डेगमा येथील बसफेरी कमी प्रवासीसंख्येमुळे बंद करण्यात आली होती. नागरिकांची मागणी लक्षात घेता पुन्हा दोन बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. या बसफेरीला पुरेसे प्रवासी मिळाले तर बसफेरी कायम सुरू राहील.- सुधीर पंचभाई,विभागीय नियंत्रक,राज्य परिवहन महामंडळ

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ