शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात शॉर्ट सर्किटमुळे बस जळाली : लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:06 IST

प्रवाशांनी भरलेल्या सिटी बसला मंगळवारी सकाळी ६.३० वाजता अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटने आग लागली. बसच्या समोरील भागातून धूर निघताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पण चालक आणि वाहकाच्या दक्षतेमुळे जीवहानी टळली.

ठळक मुद्देचालक व वाहकाच्या दक्षतेने जीवहानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवाशांनी भरलेल्या सिटी बसला मंगळवारी सकाळी ६.३० वाजता अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटने आग लागली. बसच्या समोरील भागातून धूर निघताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पण चालक आणि वाहकाच्या दक्षतेमुळे जीवहानी टळली.बसमधून निघू लागताच चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी करून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले आणि अग्निशमन दलाला सूचना दिली. बस जळाल्यामुळे मनपाच्या वाहतूक विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, हिंगणा डेपोतून सीताबर्डीकडे बस क्रमांक एमएच-३१ सीए ६२४५ निघाली. बालाजीनगर भागात बसमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे बसमधून धूर निघू लागला. त्यानंतर आग लागली. प्रारंभी धूर निघताच बसचालक मनीष करांगळे आणि वाहक अमितने सर्वप्रथम बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि तात्काळ बसमधील सर्व १५ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर अग्निशमन विभागाला आगीची सूचना देण्यात आली. दहा मिनिटातच अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी पोहोचली. तोपर्यंत बसचा बहुतांश भाग जळाला होता. कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणली. अचानक आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण होते.मनपातर्फे ऑपरेटरला दिलेली ही बस स्टॅण्डर्ड होती. देखभाल आणि दुरुस्ती करूनच या बसेस रस्त्यावर चालविण्यात येत आहेत. पण यातील बहुतांश बसेस चालविण्यास अकार्यक्षम आहेत. ही घटना वेळेत लक्षात आली नसती तर मोठी दुर्घटना झाली असती. अकार्यक्षम बसेसला ताफ्यातून तात्काळ हटविण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :fireआगBus Driverबसचालक