भाजलेल्या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:09 AM2021-04-10T04:09:26+5:302021-04-10T04:09:26+5:30

रेवराल : खेळत असताना हंड्यातील गरम पाणी पडल्याने तीन वर्षीय बालिका भाजली गेली. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ...

Burnt girl dies during treatment | भाजलेल्या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू

भाजलेल्या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू

Next

रेवराल : खेळत असताना हंड्यातील गरम पाणी पडल्याने तीन वर्षीय बालिका भाजली गेली. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना अराेली (ता. माैदा) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील निमखेडा येथे नुकतीच घडली.

आरती तिलकचंद सगरिया (३, रा. निमखेडा, ता. माैदा) असे दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. ती नेहमीप्रमाणे घरात खेळत हाेती. खेळता-खेळता ती चुलीवरील पाण्याच्या हंड्याजवळ गेली. हंडा पडल्याने त्यातील गरम पाण्यामुळे ती ३३ टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाली. तिला लगेच भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर तिला नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी अराेली पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास पाेलीस शिपाई मंगेश करीत आहेत.

Web Title: Burnt girl dies during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.