शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एम्प्रेस मॉलमधील मोबाईल शॉपी फोडली: साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 20:29 IST

एम्प्रेस मॉलमधील मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी आतमधील मोबाईल, लॅपटॉपसह साडेसहा लाखांचा ऐवज चोरून नेला. तक्रार दाखल होताच गणेशपेठ पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देनागपुरातील गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, दोन संशयितांची चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एम्प्रेस मॉलमधील मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी आतमधील मोबाईल, लॅपटॉपसह साडेसहा लाखांचा ऐवज चोरून नेला. तक्रार दाखल होताच गणेशपेठ पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.विशांत राजकुमार मेश्राम (वय ३१, रा. भीम चौक, नागपूर) यांचे एम्प्रेस मॉलच्या पहिल्या माळ्यावर ११८ क्रमांकाच्या गाळ्यात लॅपटॉप आणि मोबाईल शॉपी आहे.२३ जुलैला रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान बंद केले. बुधवारी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना आतमधील मोबाईल, लॅपटॉप, हार्डडिस्क, मदरबोर्ड आणि काऊंटरमधील दोन हजार रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी काचेच्या दाराचे नट बोल्ट उघडून आत प्रवेश केला आणि ही चोरी केली. मेश्राम यांनी या प्रकाराची तक्रार गणेशपेठ ठाण्यात नोंदवली. त्यावरून गणेशपेठ पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. या चोरीत सहभागी असणाऱ्या काही संशयितांची नावेही त्यांनी तक्रारीत नमूद केली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी दोन संशयितांना ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलीस सांगत होते.सीसीटीव्ही कॅमेरे बंदपोलिसांनी या चोरीचा छडा लावण्यासाठी सर्वप्रथम तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलिसांच्या हाती काहीच लागू शकले नाही. एम्प्रेस मॉलसारख्या पॉश आणि मोठ्या व्यापारी संकुलातील दुकानांचे सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळल्याने काही वेळेसाठी पोलिसांनी कपाळावर हात मारून घेतला.

टॅग्स :Empress Mallएम्प्रेस मॉलtheftचोरी