सावनेर : चाेरट्याने घरफाेडी करीत साेन्या-चांदीचे दागिने आणि राेख रक्कम असा एकूण ५९ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील धापेवाडा येथे शुक्रवारी (दि. १२) दुपारी घडली.
सूर्यकांत देवाजी पराते (६०, रा. बैतुले ले-आऊट, धापेवाडा, ता. कळमेश्वर) हे त्यांच्या पत्नीसाेबत शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास कामावर गेले हाेते. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने दाराचे कुलूप व कडी ताेडून आत प्रवेश केला. यात त्याने लाेखंडी पेटीतील ५४ हजार रुपयाचे साेन्या-चांदीचे दागिने आणि ५,०५० रुपये राेख असा एकूण ५९ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. सूर्यकांत पराते सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घरी परत आल्यावर त्यांना चाेरी झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार पांडे करीत आहेत.