शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
2
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
3
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
4
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
5
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
6
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
7
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
8
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
9
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
10
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
11
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
12
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
13
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
14
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
15
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
16
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
17
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
18
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
19
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल

उपराजधानीतील ‘सिटी सर्व्हे’चा लाचखोर कर्मचारी अखेर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 10:51 IST

भूमापन अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याला एक लाख रुपये लाच मागण्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

ठळक मुद्देएक लाख रुपये मागितलेएसीबीकडून सहा दिवसानंतर जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूमापन अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याला एक लाख रुपये लाच मागण्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. आश्रय मधुकर जोशी (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. तो सर्व्हेअर म्हणून कार्यरत आहे. सहा दिवसांपूर्वी लावलेल्या सापळ्यातून निसटून जोशी पळून गेला होता. अखेर गुरुवारी तो एसीबीच्या हाती लागला.तक्रारकर्ता उमरेड मार्गावरील भांडे प्लॉट चौकाजवळ राहतो. बापूनगरात त्याचा वडिलोपार्जित २६९३ चौरस फुटाचा भूखंड आहे. त्याचा कोर्टात वाद सुरू होता. १९९० मध्ये अतिरिक्त जमीन ८९४ चौरस फुटासाठी बापूनगर गृहनिर्माण सोसायटीसोबत त्यांच्या वडिलांचा व्यवहार झाला होता. त्यानुसार न्यायालयाने तक्रारकर्त्यांच्या बाजूने निकाल दिला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर ८९४ चौरस फूट जमीन ११४ क्रमांकाच्या भूखंडात समाविष्ट करण्यासाठी तक्रारकर्त्यांनी नगर भूमापन अधिकारी - २ यांच्या कार्यालयात रीतसर अर्ज केला होता. हे काम करून देण्यासाठी भूमापक आश्रय जोशी याने तक्रारकर्त्यांकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम दिल्याशिवाय तो काम करणार नाही, हे लक्षात आल्यामुळे तक्रारकर्त्यांनी एसीबीच्या कार्यालयात ५ नोव्हेंबरला तक्रार नोंदवली. त्याची शहानिशा झाल्यानंतर सापळा लावण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारकर्त्यांनी ७ नोव्हेंबरला सर्व्हेअर जोशी यांना फोन करून लाचेचे एक लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. जोशीने त्यांना ८ नोव्हेंबरला वेगवेगळ्या ठिकाणी लाचेची रक्कम घेऊन बोलविले. दिवसभरात तीन ते चार स्थान बदलविल्यानंतर अखेर सक्करदरा येथील क्रिकेट मैदानाजवळ एक लाख रुपये घेऊन ये, असे सांगितले. त्यानुसार, एसीबीच्या पथकाने सापळा लावला. ठरल्याप्रमाणे जोशीला जेरबंद करण्यासाठी एसीबीचे पथक तक्रारकर्त्यांच्या आजूबाजूला क्रिकेट मैदानाजवळ गोळा झाले. संशय येऊ नये म्हणून काही जण ट्रॅकसूटमध्ये होते. मात्र, जोशीला त्याची कुणकुण लागली की काय कळायला मार्ग नाही. तो लाचेची रक्कम न घेताच तेथून पळून गेला. त्याने आपला मोबाईलही स्वीच्ड आॅफ केला. त्यामुळे एसीबीचे कर्मचारी त्याचा शोध घेत होते. अखेर गुरुवारी दुपारी तो त्याच्या घरी परतल्याचे कळताच एसीबीच्या पथकाने त्याला जेरबंद केले. त्याच्याविरुद्ध सक्करदरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या घराचीही यावेळी झडती घेतली मात्र फारसे काही त्यांच्या हाती लागले नाही. एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर अधीक्षक राजेंद्र दुद्धलवार, उपअधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज उकंडे, हवलदार अशोक बैस प्रभाकर बेले, मंगेश कळंबे, वकिल शेख आदींनी ही कारवाई केली.खाली एसीबी, वर सिटी सर्व्हे !एसीबीच्या कार्यालयाच्या वरच्या माळ्यावरच भूमापन कार्यालय आहे. तेथे लाच दिल्याशिवाय कामच होत नाही, अशी अनेक वर्षांपासूनची ओरड आहे. अर्थात् या कार्यालयातील मंडळीवर एसीबीचा कसलाही धाक नसल्याचे म्हटले जाते. तर, या कार्यालयावर आमची नजर असल्याचे काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रपरिषदेत एसीबीच्या उपायुक्त रश्मी नांदेडकर यांनी म्हटले होते. पकडला गेलेला काही महिन्यांपूर्वीपर्यंत व्यसन मुक्ती केंद्रात उपचार घेत होता. तो भाड्याच्या घरात राहतो, असेही प्राथमिक चौकशीत उघड झाल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग