शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

बीअर बारसमोर गोळीबार एका गुंडाचा दुस-यावर हल्ला : जरीपटक्यात थरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 22:38 IST

गुंडांच्या दोन टोळ्यात बीअर बारमध्ये वाद झाल्यानंतर एका गुंडाने दुस-यावर गोळीबार केला.

नागपूर - गुंडांच्या दोन टोळ्यात बीअर बारमध्ये वाद झाल्यानंतर एका गुंडाने दुस-यावर गोळीबार केला. प्रतिस्पर्धी गुंडाने प्रसंगावधान राखल्याने तो बचावला. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर जरीपटक्यातील एका बीअर बारसमोर ही घटना घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

शुक्रवारी मध्यरात्री जरीपटका बाजाराजवळच्या रॉयल बारमध्ये बेझनबागेतील बबलू उर्फ संतोष रामबहादुर यादव (वय ३०) जानू कावरे आणि अन्य मित्रासोबत दारू पीत होता. त्याच्याच बाजुच्या टेबलवर इंदोरातील रवी रतन बोरकर, कांची, मिथून  अन्य काही मित्रांसोबत दारू पीत होता. दारू चढल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. त्यामुळे बारमालकाने त्यांना बाद बंद करायचा आहे, असे सांगून बाहेर काढले. रस्त्यावर येताच त्यांनी एकमेकांना मारहाण केली. त्यानंतर एका रवी बोरकरने पिस्तूल काढून बबलूवर गोळीबार केला.

प्रसंगावधान राखत बबलू खाली बसल्याने गोळी दुसरीकडे निघून गेली. या प्रकारामुळे घाबरलेल्या बबलू आणि त्याच्या साथीदारांनी तेथून पळ काढला. तर, रवी आणि त्याच्या मित्रांनीही तेथून पलायन केले. दरम्यान, गोळीबार होताना पाहिलेल्या एकाने नियंत्रण कक्षात माहिती दिली. त्यानंतर जरीपटका पोलीस ठाण्यातील ताफा तसेच आजूबाजूच्या भागात गस्तीवर असलेली पोलिसांची पथके तेथे पोहोचली. जरीपटक्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांचा संभ्रम घटनास्थळी पोलिसांना एक रिकामे काडतूस (पुंगळी) सापडली. मात्र, गोळीबार नेमका कुणी  केला, त्याबाबत पोलीस अधिकाºयांची संभ्रमाची अवस्था होती. सीसीटीव्ही फुटेजची तपासपणी केल्यानंतर पोलिसांना आरोपींची ओळख पटली. त्यानंतर आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला. विशेष म्हणजे, रवी बोरकर हा कुख्यात गुंड असून, त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर बबलू आणि जानू कावरेचा गुन्हेगारी अभिलेख आहे. त्यांच्यावरही गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सांगतात. सूत्रांच्या माहितीनुसार, गोळीबार करणारे गुंड रामटेककडे मोटरसायकलने पळून गेले. तिकडेही पोलीस पथके रवाना झाली आहेत.  

टॅग्स :Crimeगुन्हा