शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
4
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
5
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
6
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
7
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
8
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
9
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
10
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
11
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
12
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
13
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
14
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
15
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
16
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
17
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
18
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
19
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
20
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...

म्हाडा कॉलनीवर गुंडांचा हल्ला

By admin | Updated: May 21, 2015 02:18 IST

उत्तर नागपुरातील कुख्यात गुंड ‘यावा’चा मुलगा औरभ आणि कुटुंबीयांनी जरीपटका येथील म्हाडा कॉलनीवर हल्ला करून दहशत पसरवली.

नागपूर : उत्तर नागपुरातील कुख्यात गुंड ‘यावा’चा मुलगा औरभ आणि कुटुंबीयांनी जरीपटका येथील म्हाडा कॉलनीवर हल्ला करून दहशत पसरवली. शस्त्रांनी सज्ज यावाचा मुलगा व पुतण्याने एक डझनपेक्षा अधिक घरांवर हल्ला करून सामानांची व वाहनांची तोडफोड केली. महिला व पुरुषांना घरात घुसून मारहाण केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. गुन्हेगारांशी संगनमत असल्याने पोलिसांनी या घटनेला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे २४ तास उलटूनही आरोपी मोकाट आहेत. कुख्यात यावा याचा टेका नाका येथे जुगार अड्डा आहे. १५ दिवसांपूर्वी डीसीपी झोन चारच्या चमूने येथे धाड टाकली होती. म्हाडा कॉलनी येथील २७ वर्षीय संतोष यादव सोमवारी रात्री ९.३० वाजता त्याचा मित्र प्रकाश आणि मंजीतसोबत टेका नाका येथील पिंटूच्या पानटपरीवर गेला होता. तिथे यावाचा मुलगा व भाऊसुद्धा आला होता. त्यांनी संतोषच्या मित्रांना धक्का दिला होता. धक्का देण्याचे कारण विचारले असता दोघेही काहीही न बोलता निघून गेले होते. त्यानंतर संतोषही आपल्या घरी परत आला. रात्री १०.३० वजता यावाचा मुलगा, भाऊ आणि पुतण्या तसेच २० ते २५ साथीदार शस्त्रांसह म्हाडा कॉलनी येथे आले. त्यांनी घरासमोर असलेल्या संतोषच्या मित्राच्या स्वीप्ट कारची तोडफोड केली. यानंतर बानोरकर नावाच्या महिलेच्या घरात घुसून सामान व वाहनांची तोडफोड केली. शेख आरीफ यांच्याही घरातील सामानांची व वाहनांची तोडफोड केली. त्यांच्या घरासमोर असलेली इनोव्हा गाडीची तोडफोड केली. संतोष यादवच्या घरावरही हल्ला करून तोडफोड केली. हल्लेखोरांनी डझनभर घरांवर हल्ला केला. अर्धा तास ही तोडफोड सुरू होती. आरोपी नागरिकांना जीवे मारण्याची धमकी देऊन फरार झाले. पीएसआय योगिता श्रीखंडे यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. यावाची मुले व भाऊ गुन्हेगार आहेत. वर्षभरापूर्वीच यावाच्या मुलाने जुगार अड्ड्याची तक्रार केल्यामुळे तीन तरुणांवर खुनी हल्ला केला होता. यानंतर अनेकदा त्याच्याविरुद्ध तक्रारी आल्या परंतु पोलिसांनी त्या सर्व दाबून ठेवल्या. यावाच्या जुगार अड्ड्याची माहिती आहे. हा हल्ला सुद्धा जुगार अड्ड्यासाठीच झाला. परंतु मागील काही दिवसांपासून जरीपटका परिसरात सुरू असलेल्या अराजकतेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)पोलिसांची भीती संपली यावाचे कुटुंबीय २० ते २५ साथीदारांसोबत शस्त्रांनी सज्ज होऊन टेका नाकावरून म्हाडा कॉलनीपर्यंत येऊन एखाद्या वस्तीवर हल्ला करतात आणि संपूर्ण वस्तीला धमकी देऊन परत जातात. यावरून त्यांची हिम्मत लक्षात घेता पोलिसांची कुठलीही भीती त्यांना राहिलेली नसल्याचे दिसून येते. तसेच पोलीस आयुक्त बदलल्यानंतरही शहरातील गुन्ेहगारीची परिस्थिती मात्र बदललेली नाही, हे स्पष्ट होते.