शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धिस्ट लॉसाठी धम्मसंसद २७ ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:14 IST

आॅल इंडिया अ‍ॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉच्यावतीने बौद्ध धम्माच्या स्वतंत्र कायद्याकरिता देशव्यापी आंदोलनाची आवश्यकता या विषयावर दुसऱ्या बौद्ध धम्म संविधानिक हक्क संसदेचे आयोजन येत्या २७ जून रोजी करण्यात आले आहे. दिल्ली शासनाचे सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र पाल गौतम उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. मुकुंद खैरे यांनी दिली.

ठळक मुद्देदिल्ली सरकारचे मंत्री राजेंद्र गौतम येणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅल इंडिया अ‍ॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉच्यावतीने बौद्ध धम्माच्या स्वतंत्र कायद्याकरिता देशव्यापी आंदोलनाची आवश्यकता या विषयावर दुसऱ्या बौद्ध धम्म संविधानिक हक्क संसदेचे आयोजन येत्या २७ जून रोजी करण्यात आले आहे. दिल्ली शासनाचे सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र पाल गौतम उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. मुकुंद खैरे यांनी दिली.कमिटीच्या नागपूर शाखेच्यावतीने नुकताच विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील यावेळी उपस्थित होते. मेळाव्यामध्ये कमिटीतर्फे तयार करण्यात आलेल्या बौद्ध कायद्याच्या बिलाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेवर काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबतही चर्चा करण्यात आली. अ‍ॅड. खैरे यांनी सांगितले, एप्रिल महिन्यात दिल्ली येथे धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी दिल्ली शासनाने सकारात्मकता दाखवत राजेंद्र गौतम यांना भेटीसाठी पाठविले होते. दुसरीकडे केंद्र शासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता देशव्यापी आंदोलन करण्याची कमिटीने तयारी केल्याचे ते म्हणाले. आंदोलनाची आवश्यकता लक्षात घेता, २७ जून रोजी धम्म संसदेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र गौतम यांच्यासह धम्मगुरू भदंत महास्थवीर सारीपुत्त, भदंत कुणालकीर्ती, भदंत पंडितानंद, भदंत महामोग्गलायन, भदंत कमालधम्मो, भदंत विपश्यी, माजी आमदार उपेंद्र शेंडे, दयासागर बौद्ध आदी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मेळाव्याला बंडोपंत टेंभुर्णे, प्रा. अशोक वानखडे, प्रा. प्रमोद मेश्राम, धनराज धोपटे, चंद्रभागा पानतावणे, संगीता खोब्रागडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमnagpurनागपूर