शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘बुद्धीस्ट सर्किट’ केवळ घोषणाच, अंमलबजावणी कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 01:17 IST

केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत नागपुरातील बुद्धिस्ट सर्किटची घोषणा करीत दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि शांतिवन चिचोली हे आपसात जोडण्याची घोषणा केली होती. परंतु दोन वर्षे झाली ही तिन्ही स्थळे आपसात अजूनही जुळलेली नाही. त्यामुळे बुद्धिस्ट सर्किट आपसात कधी जुळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देदीक्षाभूमी-ड्रॅगन पॅलेस-चिचोली एकमेकांशी कधी जुळणार ?देशभरातील बुद्धिस्ट सर्किटचीही अशीच स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत नागपुरातील बुद्धिस्ट सर्किटची घोषणा करीत दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि शांतिवन चिचोली हे आपसात जोडण्याची घोषणा केली होती. परंतु दोन वर्षे झाली ही तिन्ही स्थळे आपसात अजूनही जुळलेली नाही. त्यामुळे बुद्धिस्ट सर्किट आपसात कधी जुळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.तथागत गौतम बुद्धांमुळे जगभरातील बौद्धांमध्ये भारताबद्दल विशेष प्रेम आहे. भारतातील बौद्ध स्थळांना ते वर्षभर भेटी देत असतात. त्यामुळे बौद्ध स्थळांना पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केल्यास मोठ्या प्रमाणावर पर्यटक वाढतील आणि त्यातून रोजगार वाढेल, या उद्देशाने केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी देशभरातील ३८ बुद्धिस्ट सर्किटची घोषणा केली. यात नागपुरातील दीक्षाभूमी-ड्रॅगन पॅलेस आणि शांतिवन चिचोली तर अजिंठा-वेरुळ आणि मुंबई चैत्यभूमी असा समावेश आहे. ही घोषणा करताना त्याचा मुख्य उद्देश अ्सा होता की, दीक्षाभूमीला आलेल्या पर्यटकास तेथूनच ड्रॅगन पॅलेस व चिचोलीला जाता यावे, यासाठी कनेक्टिव्हीटी, वाहनांची साधने असावीत. परंतु या दिशेने कुठलीही व्यवस्था दोन वर्षात झाल्याचे दिसून येत नाही. केवळ धम्मदीक्षा सोहळ्याच्या वेळी अतिरिक्त बसेसच्या फेऱ्या चालवल्या जातात. वर्षभर जैसे थे स्थिती असते. शांतिवन चिचोली येथे जाण्यासाठी तर बस सुद्धा नाही. पर्यटकांना आपल्या वाहनाने जावे लागते. थेट चिचोलीपर्यंत बसही जात नाही, अशी अवस्था आहे. तेव्हा विदेशी पर्यटक तर दूरच देशातील पर्यटक ही येणार नाहीत.सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केली नाराजीबुद्धिस्ट सर्किटच्या अंमलबजावणी संदर्भात माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्या सुलेखा कुंभारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत दीक्षाभूमी-ड्रॅगन पॅलेस आणि शांतिवन चिचोली आपसात कधी जुळतील असा प्रश्न उपस्थित केला.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर