शहरं
Join us  
Trending Stories
1
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
2
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
3
वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार
4
Hero चा धमाका! ४ ते १० वर्षीय मुलांसाठी लॉन्च केली नवी E-Bike; किंमत पाहून थक्क व्हाल
5
Lionel Messi: फुटबॉलचा 'GOAT' मेस्सीच्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल अनावरण
6
भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंगचं थैमान, या चार खेळांडूंना केलं, सस्पेंड, FIRही दाखल
7
Messi India Tour: १०० कोटींचे जेट, १०० कोटींचे घर... लियोनेल मेस्सीची नेटवर्थ किती? फुटबॉलचा जादूगार भारताच्या दौऱ्यावर
8
अरेरे! इन्स्टावरचं प्रेम पडलं महागात; बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी दिल्लीहून रायबरेलीला आली पण...
9
'धुरंधर'मधल्या या अभिनेत्रीला लूक्सवरुन ऐकावे लागलेले टोमणे, नाक आणि दात बदलण्याचा मिळालेला सल्ला
10
आलिशान घर, राईस मिल, पेट्रोल पंप... अधिकाऱ्याकडे सापडलं ४० लाखांसह कोट्यवधींचं घबाड
11
पुढील ३ वर्षांत २ IPO आणण्याची रिलायन्सची तयारी; पाहा काय आहे मुकेश अंबानींचा प्लॅन
12
"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट
13
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
14
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
15
८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावात गडबड, १३ लाख जणांचे आई-वडील एकच, बंगालमधील SIR मधून धक्कादायक माहिती समोर
16
Crime: प्रेयसीनं संबंध तोडल्यानं भडकला प्रियकर, घरात घुसून तिच्यावर झाडल्या गोळ्या!
17
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
18
शुक्र गोचर २०२५: वर्षाखेरिस 'या' ५ राशींना मिळणार धन, संपत्ती करिअरबाबत मोठी भेट
19
सफला एकादशी २०२५: सफला एकादशीचा गुप्त उपाय! कागदावर ३ इच्छा लिहा, २०२६ ला इच्छापूर्तीचा अनुभव घ्या!
20
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील चित्रफित व्हायरल केल्याने भावाने केली बहिणीच्या प्रियकराची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2023 22:51 IST

Nagpur News तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या प्रियकराने वस्तीतील व्हॉट्सअप ग्रूपवर अश्लिल चित्रफित व्हायरल केली. परिणामी मोठी बदनामी झाल्याने चिडलेल्या तरुणीच्या भावाने बहिणीच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली.

नागपूर : तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या प्रियकराने वस्तीतील व्हॉट्सअप ग्रूपवर अश्लिल चित्रफित व्हायरल केली. परिणामी मोठी बदनामी झाल्याने चिडलेल्या तरुणीच्या भावाने बहिणीच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली. मंगळवारी भरदुपारी ही थरारक घटना गिट्टीखदानमध्ये घडली. कपील डोंगरे (३७, गंगानगर, गिट्टीखदान) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

कपील डोंगरे हा अविवाहित असताना त्याचे वस्तीतील एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याचे ठरविले होते. मात्र, दोघांच्याही कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. दरम्यान, त्या युवतीचे दुसऱ्या एका तरुणासोबत लग्न झाले. कपिलनेही बालाघाटमधील तरुणीशी लग्न केले. दोघांचाही संसार चांगला सुरु होता.

दरम्यान, कपीलने गिट्टीखदानमध्ये मोबाईल शॉप टाकले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी कपील हा रायपूरला गेला. तेव्हा त्याने विवाहित प्रेयसीला फोन केला. तिला भेटायला एका हॉटेलमध्ये बोलावले. तेथे त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी कपीलने शरिरसंबंधाची क्लीप बनविली.

काही दिवसांपूर्वी कपील सोबत दुसऱ्याच तरुणीचे नको त्या अवस्थेत मोबाईलमध्ये फोटो दिसल्याने कपिलची पत्नी संतापली. त्यावरून पती-पत्नीत खटके उडू लागले. कपिलकडून नंबर घेऊन पत्नीने त्या तरुणीला फोन लावून तिची खरडपट्टी काढली. कपीलच्याही कुटुंबियांना त्याच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती देऊन मोठा वाद घातला. दरम्यान, नातेवाईकांनी तिची समजूत घालून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती मानायला तयार नव्हती. तिने पतीच्या मोबाईलमधून प्रेयसीसोबतचे काही अश्लील छायाचित्र आणि चित्रफीती काढल्या आणि वस्तीतील ओळखीच्या व्यक्तींच्या एका व्हॉट्सअप ग्रूपवर त्या व्हायरल केल्या. त्यामुळे त्या तरुणीसोबत तिच्या कुटुंबिुयांचीही वस्तीत बदनामी झाली. हा प्रकार असह्य झाल्याने तरुणीच्या भावाने कपिलला जाब विचारला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि तरुणाने मंगळवारी दुपारी आधी कपिलवर लाकडी दांड्याने हल्ला चढवला नंतर त्याला दगडाने ठेचून त्याची हत्या केली.

स्वत:च ठाण्यात पोहचला

हत्या केल्यानंतर आरोपी स्वत:च पोलीस ठाण्यात पोहचला. तेथे त्याने हत्येच्या घटनेची माहिती देऊन स्वत:ला अटक करवून घेतली. दरम्यान, या घटनेमुळे गिट्टीखदानमध्ये प्रचंड थरार निर्माण झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी