शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
3
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
4
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
5
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
6
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
7
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
8
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
9
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
10
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
11
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
12
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
13
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
14
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
15
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
16
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
17
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
18
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
19
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

देशातील घडामोडींसाठी यापुढे ब्रिटिशांना दोष देता येणार नाही : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 22:48 IST

गुलाम होतो तेव्हा कसेही वागलेले चालले, आता विचारपूर्वक वागावे लागेल. यापुढच्या कोणत्याही गोष्टींसाठी ब्रिटिशांना दोषी धरता येणार नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरा.स्व. संघाचा नवोत्सव कार्यक्रम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राजकीय दृष्टीने खंडित असला तरी आपला देश आता स्वतंत्र झाला आहे. आता देशाचे स्वातंत्र्य टिकविणे, राज्य सुचारुपणे चालविणे ही आपली जबाबदारी आहे. यापुढे देशाचे जे काही चांगले वाईट होईल, त्यासाठी आपण जबाबदार असू. गुलाम होतो तेव्हा कसेही वागलेले चालले, आता विचारपूर्वक वागावे लागेल. यापुढच्या कोणत्याही गोष्टींसाठी ब्रिटिशांना दोषी धरता येणार नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

रा. स्व. संघाच्या नागपूर महानगरच्यावतीने 'नवोत्सव २०२०' हा गुणवत्ता प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम गुरुवारी यशवंत स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला. या अंतर्गत सामूहिक शारीरिक प्रात्यक्षिक व स्पर्धेचेआयोजन करण्यात आले. याप्रसंगी संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे आदी उपस्थित होते. यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना डॉ. भागवत म्हणाले, रा. स्व. संघाच्या या गुणवत्ता प्रात्यक्षिक कार्यक्रमातूनच अनुशासन व स्वयंसेवकांमध्ये गुणनिर्मिती होते. संघाच्या या कार्यक्रमातून वैयक्तिक नाही तर सामूहिकतेची भावना वाढते. अनुशासन, भक्ती आणि विवेक जागवून  राष्ट्रबांधणीसाठी कार्य करण्याची भावना या उपक्रमातून होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांची भावना प्रत्यक्ष आचरण करण्याची साधना आहे.  राष्ट्र आणि मानवतेच्या उत्थानासाठी कार्य करण्याची प्रेरणा यातून मिळते. ज्ञान म्हणजे माहितीचा योग्य उपयोग करण्याची दिशा आणि लक्ष्य निर्धारीत करण्याची पद्धत होय. यातून संपूर्ण समाजाला एकत्रित करून विश्वाला मानवता देणारा भारत निर्माण करायचा आहे. समाजात ज्या प्रकारचे परिवर्तन हवे आहे, त्या प्रकारचे आपले आचरण असायला हवे. दैनंदिन जीवनात नागरिकता अनुशासनाचे पालन करणे हीच देशभक्तीची अभिव्यक्ती होय. त्यामुळे नागरिक आणि सामाजिक अनुशासन राखणे ही आपली सवय बनावी. संपूर्ण समाजाचे जीवन व्यवस्थित चालेल या समाजार्पण वृत्तीने कार्य करावे लागेल आणि या आधारावरच आपला देश परमवैभवसंपन्न होईल, अशी भावना डॉ. भागवत यांनी व्यक्त केली.
यावेळी सोमलवाडा भागाच्या तीन गणांनी गणसमानताचे प्रात्यक्षिक सादर केले. मोहिते भागाने नियुद्ध कला, इतवारी भागाने सामूहिक गन समता, लालगंज भागाने पदविन्यास कला, सदर-गिट्टीखदान भागाने योगासन, त्रिमूर्तीनगर भागाने दंड क्रमिक, अयोध्या भागाने योगासन, नंदनवन भागाच्य स्वयंसेवकांनी विनाशस्त्र नियुद्ध कला व अजनी भागाने गीताचे सादरीकरण केले. प्रास्ताविक करताना महानगर संघचालक राजेश लोया यांनी स्पर्धेचे निकाल जाहीर केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक घोष, द्वितीय नंदनवन भाग व तृतीय क्रमांक धरमपेठ आणि सोमलवाडा भागांनी संयुक्तरीत्या पटकाविला.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत