शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणू : अ‍ॅड. हरीश साळवे यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 00:15 IST

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना एक दिवस परत आणू, असा विश्वास माजी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया व सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील अ‍ॅड. हरीश साळवे यांनी शनिवारी दत्तोपंत ठेंगडी व्याख्यानमालेत व्यक्त केला.

ठळक मुद्देसंपूर्ण जगाचे लक्ष असल्यामुळे पाकिस्तानवर दबाव

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना एक दिवस परत आणू, असा विश्वास माजी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया व सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील अ‍ॅड. हरीश साळवे यांनी शनिवारी दत्तोपंत ठेंगडी व्याख्यानमालेत व्यक्त केला. ते लंडन येथून ऑनलाईन बोलले.  अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्यावतीने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘आंतरराष्ट्रीय न्यायालयातील कुलभूषण जाधव प्रकरणाचे विश्लेषण व माझे अनुभव’ हा व्याख्यानाचा विषय होता. पाकिस्तानने कुलभूषण जाधव प्रकरणात सुरुवातीपासूनच व्हिएन्ना कन्व्हेन्शन व मानवाधिकाराचे पालन केले नाही. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना हेरगिरी व दहशतवादी कारवायाच्या आरोपाखाली दोषी ठरवून फाशीची शिक्षा दिल्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागून विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताचे मुद्दे उचलून धरून जाधव यांना हेरगिरी व दहशतवादी कारवायाच्या आरोपाखाली दोषी ठरविण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा व तेव्हापर्यंत फाशीची शिक्षा स्थगित ठेवण्याचा आदेश पाकिस्तानला दिला. तसेच, जाधव यांना भारत कायदेशीर मदत करेल असेही स्पष्ट केले. हा भारताचा मोठा विजय आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय लक्षात घेता पाकिस्तानने जाधव यांना आतापर्यंत मानवतेच्या आधारावर सोडायला हवे होते. यासाठी भारताने पाकिस्तानला पाच-सहा पत्रेही पाठवली आहेत. परंतु, पाकिस्तानमध्ये अहंकार ठासून भरला आहे. सध्या ते जाधव यांना सोडतील असे दिसत नाही. त्यामुळे आपण पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा विचार करीत आहोत असे अ‍ॅड. साळवे यांनी सांगितले.पाकिस्तानमधील न्यायालयाने भारतीय नागरिक सरबजितसिंग यांनाही फाशीची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, कारागृहातील एका बंदिवानाने प्राणघातक हल्ला केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याकडे एका प्रश्नाद्वारे अ‍ॅड. साळवे यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भात असे होणार नाही असे मत व्यक्त केले. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालल्यामुळे त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. परिणामी, पाकिस्तान एवढा वाईट वागणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.  

जगाला भारतीय परंपरेची ओळख करून दिलीजाधव यांचे प्रकरण सुरू असताना पाकिस्तानचे वकील कुरैशी यांनी धमकी देणारे पत्र लिहिले होते. तसेच, न्यायालयातही भारतासंदर्भात आक्षेपार्ह शब्दांचा उपयोग केला होता. परंतु, आपण त्यांना अत्यंत संयमाने उत्तर दिले. आपण न्यायालयाचा आदर करतो व भारतीय परंपरा अशा पद्धतीने वागण्याची अनुमती देत नाही हे आपण जगाला दाखवनू दिले. प्रकरण संपल्यानंतर न्यायालयाच्या व्यवस्थापकांनी भारताच्या संयमी वागण्याची प्रशंसा केली, असे अ‍ॅड. साळवे यांनी अभिमानाने सांगितले.पाकिस्तानने अवैध पद्धतीने प्रकरण तयार केलेपाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्याविरुद्ध अवैध पद्धतीने प्रकरण तयार केले हे जागोजागी दिसून येते. जाधव यांचा मोघम पद्धतीचा कबुलीजबाब तयार करण्यात आला. त्यात विशिष्ट प्रसंगाचा उल्लेख नव्हता. तारखा बरोबर नव्हत्या. यासह विविध त्रुटी होत्या. त्या आधारावर कबुलीजबाब निरर्थक ठरतो. त्यानंतर प्रकरणात काहीच वाचत नाही. जाधव यांच्याकडे बनावट पासपोर्ट होता हे मान्य केले तरी, त्यासाठी फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही. याशिवाय जाधव यांच्याविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखविण्यात आले आहेत. परंतु, त्याकरिता वेगवेगळे एफआयआर नोंदविण्यात आले नाही व स्वतंत्र खटले चालविण्यात आले नाही. भारताला जाधव यांच्या अटकेची माहिती खूप उशिरा देण्यात आली. त्यानंतर जाधव यांना कायदेशीर मदत करण्याची अनुमतीही देण्यात आली नाही. या सर्वांचे समाधानकारक उत्तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयात देता आले नाही, अशी माहिती अ‍ॅड. साळवे यांनी दिली.

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तान