शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

बँकिंग योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा: डॉ. भागवत कराड

By मोरेश्वर मानापुरे | Updated: October 11, 2023 20:40 IST

अग्रणी बँक व्यवस्थापकांची समीक्षा बैठक.

मोरेश्वर मानापुरे, नागपूर: देशातील सर्व बँका उत्तम कार्य करीत आहे. भारत जगात वेगाने वाढणारी पाचवी अर्थव्यवस्था आहे. बँकिंग हा सर्वांचा अधिकार असून सर्व बँकांनी बँकिंग योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी येथे केले.नागपूर दौऱ्यात त्यांनी हॉटेल ली मेरीडियिनमध्ये विदर्भ क्षेत्रातील बँकांमध्ये झालेल्या वित्तीय समावेशन संदर्भात समीक्षा बैठक घेतली. त्यांनी बँकांचे वरिष्ठ अधिकारी आणि विदर्भातील अग्रणी बँक व्यवस्थापकांना मार्गदर्शन केले.

बैठकीत खा. सुनील मेंढे, बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक जय नारायन, एसएलबीसीचे उपमहाव्यवस्थापक राजेश देशमुख, नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक जोशी पुथोर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे उपमहाव्यवस्थापक स्वाती शर्मा, बँक ऑफ इंडियाच्या विदर्भ क्षेत्राचे व्यवस्थापक रमेश कुमार आणि विदर्भ क्षेत्रातील सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाची माहिती राजेश देशमुख यांनी दिली.

भागवत कराड म्हणाले, बँकांच्या प्रमुखांनी पंतप्रधान जनधन योजना, जीवन ज्योती योजना, सुरक्षा बीमा योजना, स्वनिधी योजना, मुद्रा योजना, सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान निधी योजना, मुद्रा ऋण योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांना फायदा घेण्याचे आवाहन करावे. सर्व राष्ट्रीयकृत, खाजगी, सहकारी, ग्रामीण बँकांनी मिळून भारत सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचव्यात. स्वाती शर्मा यांनी योजनांवर अधिकाधिक जागरूकता आणण्याचे आवाहन केले. राजेश देशमुख यांनी जनतेला बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी नाबार्डच्या विविध योजनांची माहिती दिली. रमेश कुमार यांनी आभार मानले.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवत