शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

बृहन्मुंबईने ‘कनक’ चे दस्तावेज मागितले; नागपूर मनपा आयुक्तांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 12:00 IST

बृहन्मुंबई महापालिकेने नागपूर महापालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांना पत्र पाठवून शहरातील कचरा संकलन व शहर बसमधील कथित घोटाळ्याची माहिती मागितली आहे.

ठळक मुद्देआयएल अ‍ॅन्ड एफएस यांची कचरा संकलनाची निविदा

राजीव सिंग।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कचरा संकलनातील अनियमितता व अतिरिक्त रक्कम उचलल्यावरून कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लिमिटेड यांची नागपूर शहरात चर्चा आहे. या प्रकरणात महापालिकेतर्फे कनक रिसोर्सेसची चौकशी सुरू आहे. दरम्यान बृहन्मुंबई महापालिकेने नागपूर महापालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांना पत्र पाठवून शहरातील कचरा संकलन व शहर बसमधील कथित घोटाळ्याची माहिती मागितली आहे.एमसीजीएम यांच्यातर्फे कचरा संकलन, परिवहन, प्रक्रिया व विल्हेवाट यासंदर्भात निविदा मागविल्या आहेत. याबाबतची निविदा आयएल अ‍ॅन्ड एफएस एन्व्हायरमेंट इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅन्ड सर्व्हिसेस लि. यांनी भरली आहे. विशेष म्हणजे कनक रिसोर्सेसचे गठन स्पेशल पर्पज व्हीकल (एसपीव्ही)च्या धर्तीवर आयएल अ‍ॅन्ड एफएस एनव्हायरमेंट इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅन्ड सर्व्हिसेस लि. ने केले होते. कनक रिसोर्सेसच्या कामात अनियमितता असल्याची माहिती निविदा भरणाऱ्या काही कंत्राटदारांनी दिली होती. तसेच या कंपनीला अपात्र ठरविण्याची मागणी केली.या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिकेचे मुख्य अभियंता, (एसडब्ल्यूएम) एस.एस. यरगर यांनी प्रकल्प नागपूर महापालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांना पत्र पाठविले असून कचरा संकलन व शहरातील बस वाहतूक या संदर्भात माहिती मागितली आहे.मिळालेल्या माहितीनुसार २६ डिसेंबर २०१७ ला पहिला ई-मेल जारी करण्यात आला. त्यानंतर २८ डिसेंबर २०१७ रोजी पत्र पाठविण्यात आले. ३ व ६ जानेवारी २०१८ रोजी ई-मेल पाठवून तातडीने माहिती पाठविण्यास सांगितले आहे.

वंंश निमय यांनी १३२ कोटी दिलेच नाहीशहरातील बस वाहतुकीची जबाबदारी मार्च २०१७ मध्ये महापालिकेने आपल्याकडे घेतली. त्यापूर्वी मेसर्स आयएल अ‍ॅन्ड एफएसतर्फे गठित स्पेशल पर्पज व्हीकल (एसपीव्ही)अंतर्गत मे. वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड यांच्या नियंत्रणात वर्ष २००८ ते फे ब्रुवारी २०१७ यादरम्यान बसचे संचालक करण्यात करण्यात आले. या कालावधीत महापालिकेला केवळ एक वर्षाची रॉयल्टी मिळाली आहे. त्यानंतर महापालिकेला कोणतीही रक्कम मिळालेली नाही. महापालिकेने या कालावधीत १३२ कोटींची थकबाकी काढली होती. परंतु ही रक्कम अद्याप भरलेली नाही.

अशी केली आर्थिक अनियमिततामहापालिकेने कनक रिसोर्सेसला २००८ साली कचरा संकलनाचे काम दिले होते. याबाबतचा १० वर्षांचा करार करण्यात आला होता. ३१ मार्च २०१८ ला हा करार संपुष्टात येणार आहे. शहरातील कचरा संकलित करून भांडेवाडी येथे नेण्याची जबाबदारी कनकची आहे. यासाठी प्रतिटन ४४९ रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आला होता. परंतु अंतर्गत तडजोड करून कंपनीला प्रतिटन १०३३.६८ रुपये दिले जात आहे. एप्रिल २०१६ मध्ये कंपनीने महापालिकेला १६०६.६९ रुपये दराचे बिल सादर केले. त्यानंतर आधीच्या कराराचे अवलोकन सुरू करण्यात आले. यात अनियमितता झाल्याचे दिसून आले. स्थायी समितीने चौकशीचे आदेश दिले. त्यानंतरही प्रतिटन १३०६ .८७ दराने बिल देण्याला मंजुरी देण्यात आली. शहरातून दररोज ११०० मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका