शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

स्तनपानदिन विशेष; स्तनपान म्हणजे बाळासाठी अमृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 12:32 IST

आईचे दूध हे अमृत मानले जाते. जन्मापासून ते पुढील सहा महिने बाळाला केवळ आईचेच दूध दिल्यास संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. शिवाय, बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

ठळक मुद्देजन्मानंतर बाळाला अर्ध्या तासात आईचे दूध आवश्यक स्तनपानाचे फायदे बाळाबरोबर आईलाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आईचे दूध हे अमृत मानले जाते. जन्मापासून ते पुढील सहा महिने बाळाला केवळ आईचेच दूध दिल्यास संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. शिवाय, बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्तनपानाचे फायदे बाळाबरोबर आईलाही होत असतात. हे फायदे केवळ शारीरिक नसून मानसिकही असतात. स्तनपानामुळे आई व बाळामधील भावनिक बंध घट्ट होण्यास मदत होते, स्तनपानाचे असे अनेक फायदे असताना अजूनही काही महिलांमध्ये गैरसमज आहेत. ते दूर होणे महत्वाचे असल्याचे बालरोग तज्ज्ञाचे म्हणणे आहे.जन्माला आल्यानंतर अर्ध्या तासात आईचे दूध मिळणे हे बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. आईचे दूध हे तिच्या शरीरात गरोदरपणातच तयार होते. बाळंतीण झाल्यानंतर दोन-तीन दिवस ते चिकासारखे घट्ट असते.बाळाला हे पहिले चिकाचे दूध मिळणे अत्यंत गरजेचे आहे, कारण यातूनच बाळाला पहिली रोगप्रतिबंधक शक्ती मिळते. आईच्या दुधात आवश्यक ती सर्व पोषकद्रव्ये असतात. त्यात बाळाला आवश्यक तेवढे पाणीदेखील असते. जास्त वेळा पाजल्याने जास्त दूध निर्माण होते. बाळाला स्वत:हून चोखण्याची सवय असावी. स्तनपान करताना बाळाला एका बाजूने किमान १५ ते २० मिनिटे किंवा बाळ स्तन सोडेपर्यंत दूध पिऊ द्यावे. पहिली पाच मिनिटे स्तनातून जास्त प्रमाणात द्रव पदार्थ येतात व नंतर मात्र दूध घट्ट येते, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

गर्भारपणापासून जन्मानंतरच्या दोन वर्षांच्या काळातील म्हणजे पहिल्या १००० दिवसांमधील पोषणावर बाळाच्या उर्वरित आयुष्यातील आरोग्यसंपदा अवलंबून असते. जन्मापासून बालकांच्या मेंदूच्या पेशींची संख्या झपाट्याने वाढत जाते. या काळात पेशींमध्ये होत असलेल्या विकासावर माणसाचे व्यक्तिमत्त्व आणि मानसिक आरोग्य बहुतांशरीत्या अवलंबून असते. बाळाची सर्वांगीण वाढ म्हणजे त्याची उंची, वजन, त्याच्या डोक्याचा घेर, त्याची बौद्धिक वाढ आणि वेग या साऱ्या गोष्टी पहिल्या १००० दिवसांच्या पोषणावर अवलंबून असतात, आणि हे पोषण आईचे दूधातूनच होते.- डॉ. राजेश अग्रवाल, बालरोग तज्ज्ञ

जन्मानंतर बाळाला पहिले सहा महिने बाहेरील दूध देऊ नये. प्रसुतीनंतर प्रथमच आईला येणारे दूध हे घट्ट व पिवळसर रंगाचे असते याला चीक-दूध, वैद्यकीय भाषेत ‘कोलोस्ट्रम’ म्हटले जाते. या दुधामुळे बाळाचे जंतुसंसगार्पासून संरक्षण होते. बाळाचे पहिले लसीकरण म्हणजे चीक-दुधाचे सेवन. जन्मत: बाळ अशक्त असेल तर या दुधाचा बाळाला चांगला फायदा होतो. जुलाब आणि न्यूमोनियासारख्या रोगांपासून बाळाचे सहज संरक्षण होते. अंगावर पिणारी बाळे २४ तासात साधारण ८ वेळा दूध पितात. ज्यांना दूध पोटभर मिळते ती बाळे सलग दोन तीन तास झोपतात. त्यांचे वजनही नियमितपणे वाढते.- डॉ. शिल्पा हजारे, बालरोगतज्ज्ञ

स्तनपानासाठी महत्त्वाचेबाळ जन्मल्यानंतर अर्धातासात स्तनपान सुरु करावे.दूध लवकर सुटते. बाळाला उब मिळते. प्रतिकारशक्ती मिळते.सहा महिने पूर्ण होईपर्यंत बाळाला फक्त स्तनपान द्यावे.वरचे काहीही देऊ नये, पाणीही नको. याने बाळ निरोगी राहते, त्याचे योग्य पोषण होते.पाजण्याआधी प्रत्येक वेळी बोंडे कोमट पाण्याने स्वच्छ केली पाहिजेत.बाळाला मांडीवर आडवे ठेवावं. जर आई कुशीवर झोपली असेल तर बाळाला तिच्या बाजूला कुशीत ठेवावे.बोंडांचा मुळापासूनचा भाग धरून तो बाळाच्या तोंडात द्यावा. अशा तºहेने संपूर्ण बोंड बाळाच्या तोंडात जाईल.बाळाचे तोंड आणि संपूर्ण शरीर आईच्या छातीकडे वळलेले असावे. बाळ वेडेवाकडे धरु नये याची काळजी घेतली पाहिजे.बाळाच्या डोक्याला एका हाताने आधार दिला पाहिजे.बाळाने बोंड सोडल्यावर ते बोंड स्वच्छ करायला हवे.एक बाजू पाजून झाल्यावर बाळाला दुसऱ्या  बाजूला धरले पाहिजे.

टॅग्स :Healthआरोग्य