शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

स्तनाच्या कर्करोगाविषयी या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 12:38 IST

ऑक्टोबर महिना हा स्तन कॅन्सर जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो.

ठळक मुद्देमहिलांमध्ये १४ टक्के स्तनाचा कर्करोग

नागपूर : भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण दिसून येत आहे. दरवर्षी १ लाख ८० हजार महिला स्तनाच्या कर्करोगाला बळी पडत असल्याचा अंदाज आहे. 

आजच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या युगात आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडत आहेत. त्यातल्या त्यात खाण्यापिण्याच्या सवयी, स्पर्धेचे युग, तणावपूर्ण जीवनासह पाश्च्यात्य संस्कृतीच्या अनुकरणाचा कळत नकळत परिणाम आपल्या शरीरावर होतो. दिवसेंदिवस विविध आजारांच्या प्रमाणातही वाढ होत आहे, त्यात महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण हे एकूण कॅन्सरपैकी जवळपास १४ टक्के असल्याची माहिती आहे. 

ऑक्टोबर महिना हा स्तन कॅन्सर जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो. एखाद्या स्त्रीच्या आई किंवा बहिणीला हा कर्करोग झाला असेल त्यांना इतरांपेक्षा हा रोग होण्याची शक्यता जास्त असते. 

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे -

- स्तनात किंवा स्तनाच्या बाजूला व काखेत गाठ येणे- स्तनाच्या आकारात बदल होणे- स्तनाग्रातून रक्त किंवा तत्सम प्रकारचा स्राव होणे- स्तनाची त्वचा लालसर होणे

स्तनाचा कर्करोग हा मुख्यत्वे महिलांमध्ये आढळत असला, तरी पुरुषांमध्ये देखील स्तनाचा कर्करोग पाहिला गेला आहे. पण पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. तर, महिलांमध्ये या आजाराचे दिवसेंदिवस वाढतच असून धावपळीचे जीवन धोक्याची घंटा ठरत आहे. 

टाळण्यासाठी हे करा -

- मद्यपान टाळा - मर्यादित हार्मोनल थेरपी- निममित व्यायाम- संतुलित आहार

- ८ ते ९ तासांची झोप आवश्यक

स्तन कॅन्सरच्या धोक्यापासून सावध राहण्यासाठी वीस वर्षांवरील सर्व महिलांनी ‘ सेल्फ ब्रेस्ट एक्झॅमिनेशन ‘, म्हणजेच स्तनाची स्वतः तपासणी करणे आवश्यक आहे. सोबतच, वयाच्या तिशी-पस्तीशीनंतर वर्षातून एकदा मॅमोग्राफी करणे गरजेचे आहे. जर स्तनामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ, किंवा सूज आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हा आजार जरी गंभीर स्वरुपाचा असला, तरी वेळेत निदान झाल्यास, व योग्य औषधोपचार झाल्यास हा आजार संपूर्ण बरा होऊ शकतो. हा रोग बरा झाल्यानंतर महिला, इतर महिलांप्रमाणेच सामान्य आयुष्य जगू शकते. या आजाराचे वेळेत निदान झाल्यास औषधोपचार सोपे, कमी वेळेसाठी आणि कमी खर्चाचे होतात.

टॅग्स :Healthआरोग्यBreast Cancerस्तनाचा कर्करोग