शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

अवैध मोबाईल टॉवरची वीज तोडा : पालकमंत्र्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:16 IST

शहरातील अवैध मोबाईल टॉवरचा त्रास होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याने अनधिकृत वा नाहरकत प्रमाणपत्र न घेतलेल्या मोबाईल टॉवरचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश महावितरणला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.

ठळक मुद्देनागपूरच्या धंतोली झोनमध्ये जनसंवाद कार्यक्रम

लोकमत न्यूज नेवटर्कनागपूर : शहरातील अवैध मोबाईल टॉवरचा त्रास होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याने अनधिकृत वा नाहरकत प्रमाणपत्र न घेतलेल्या मोबाईल टॉवरचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश महावितरणला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.नागरिकांच्या समस्या व तक्रारी मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांचा महापालिकेच्या धंतोली झोन येथे जनसंवाद कार्यक्रम झाला. यात साफसफाई, गडरलाईन व अतिक्रमणाच्या तक्रारी सर्वाधिक आल्या तसेच अवैध मोबाईल टॉवरला आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली. यावर पालमंत्र्यांनी तातडीने समस्या मार्गी लावण्याचे निर्देश दिले. कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, झोन सभापती विशाखा बांते, अतिरक्ति आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, नगरसेवक लता काडगाये, विजय चुटेले, वंदना भगत आदी उपस्थित होते.जनसंवाद कार्यक्रमात ६० तक्रारी प्राप्त झाल्या. शिक्षण, नगर भूमापन, महापालिकेचा बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, नझुल, कर निर्धारण विभाग, महावितरण, नासुप्र आदी विभागाच्या तक्रारी अधिक होत्या.शहरात मोठ्या प्रमाणात विनापरवानगी मोबाईल टॉवर उभारण्यात आलेले आहेत. यामुळे नागरिकांना त्रास होत आहे तसेचमहापालिकेचा महसूल बुडत आहे. याचा विचार करता महापालिकेने मोबाईल टॉवरसंदर्भात धोरण तयार करावे. त्याअंतर्गत मोबाईल टॉवरला परवानगी द्या. मोबाईल टॉवरला वीज जोडणी देण्यापूर्वी महावितरणने महापालिका सहायक आयुक्तांचे नाहरकत प्रमाणपत्र आहे का, याची शहानिशा करूनच वीज जोडणी द्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.नाल्याचे बांधकाम थांबले असल्याचे व साफसफाई होत नसल्याच्या सात तक्रारी या कार्यक्रमात नागरिकांनी केल्या. झोनअंतर्गत नालंदानगर, धाडीवाल ले-आऊट, पार्वतीनगर या भागात गडरलाईनचा त्रास लोकांना आहे. गडरलाईनमधील चोकेजेसमुळे घाण पाणी लोकांच्या घरात येत आहे तसेच नागरिकांच्या घरातील विहिरींचे पाणी दूषित होत असल्याचेही आढळून आले आहे.वैयक्तिक भूखंडांवर अतिक्रमण करण्यात आल्याच्या तक्रारींवरही त्वरित कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. बॅनर्जी ले-आऊट, मौजा बाबुळखेडा या भागातील रस्त्यांच्या तक्रारींची दखल घेत रस्त्यांची प्राकलने तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. गांधीसागर तलावाचे कठडे दुरुस्त करणे व तलावातील कचरा काढण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली. मॉडेल मिल चाळीतील अतिक्रमण, चिचभवनमधील रस्त्यांच्या समस्या व भूखंडधारकांना नासुप्रकडून त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या.शासनाकडून प्रत्येक झोनला बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक झोनने आवश्यक कामांसाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच शासनाच्या सर्वांना भूखंड व सर्वांना घरे, पट्टेवाटप, सर्वांसाठी आरोग्य योजना, सर्वांसाठी अन्न योजना या योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री बावनकुळे यांनी केले.मे २०१९ पर्यंत शहरातील सर्व भागातील रस्त्यांवर एलईडी दिवे लावले जाणार आहेत. यामुळे विजेची ५० टक्के बचत होणार आहे. सर्व झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप, सर्वांसाठी आरोग्य, सर्वांसाठी अन्न, सर्वांसाठी घरे या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.नासुप्रच्या मालमत्ता मनपाकडे येणारनासुप्रकडील सर्व ले-आऊ ट महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना नासुप्रकडे जाण्याची गरज भासणार नाही. तसेच लवकरच नासुप्रच्या मालमत्ता महापालिकेच्या होणार आहेत. यामुळे नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लागतील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.सोसायटीतील लोकांना रस्ता नाहीचिंचभुवन येथील क्राऊ न सोसायटीतील लोकांना रस्ता नाही. येथील नागरिकांनी नासुप्रकडे २.५० कोटी जमा केले आहे. समस्यासंदर्भात २०१५ पासून महापालिका व नासुप्रकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु अद्याप न्याय मिळाला नसल्याची तक्रार नागरिकांनी केली तसेच येथे मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आणले.

 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका