शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील प्रतापनगरात निवृत्त शासकीय अधिकाऱ्याकडे धाडसी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 19:20 IST

प्रतापनगरातील एका निवृत्त शासकीय अधिकाऱ्याच्या सदनिकेतून चोरट्यांनी पावणेचार लाखांचे दागिने चोरून नेले. बुधवारी भरदिवसा ही घरफोडीची घटना घडली.

ठळक मुद्देपावणेचार लाखांचे दागिने लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतापनगरातील एका निवृत्त शासकीय अधिकाऱ्याच्या सदनिकेतून चोरट्यांनी पावणेचार लाखांचे दागिने चोरून नेले. बुधवारी भरदिवसा ही घरफोडीची घटना घडली.शिवाजी बाबूलाल सूर्यवंशी (वय ५९) असे तक्रारकर्त्यांचे नाव आहे. शासनाच्या वजन मापे नियंत्रण विभागातून निवृत्त झालेले सूर्यवंशी प्रतापनगरातील भामटी परिसरातील सारनाथ बौद्धविहाराजवळ राहतात. साईकृपा अपार्टमेंटमधील पहिल्या माळ्यावर त्यांची सदनिका आहे. सदनिकेचे मुख्य दार आणि समोरच्या लोखंडी दाराला कुलूप लावून ते आणि त्यांची पत्नी बुधवारी दुपारी १ च्या सुमारास रामदासपेठेत गेले होते. दुपारी ४.२७ वाजता त्यांच्याकडे कुरियरवाला आला. त्यावेळी त्यांच्या दाराला कुलूप लावून होते. सायंकाळी ५.१५ च्या सुमारास सूर्यवंशी दाम्पत्य घरी परतले. तेव्हा त्यांना त्यांच्या दोन्ही दारांची कुलूपे तुटून दिसली. चोरट्यांनी स्टोअर रुमच्या कपाटात ठेवलेले ३ लाख ७३ हजारांचे दागिने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शेजाऱ्यांना आणि प्रतापनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक केवटी आणि त्यांचे सहकारी तेथे पोहचले. ठसे तज्ज्ञांचे पथकही बोलवून घेण्यात आले. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही शोधले मात्र परिसरात कुठेही सीसीटीव्ही नसल्याने चोरट्यांबाबत धागादोरा मिळाला नाही. सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.चार दिवसांतील दुसरी घटनाप्रतापनगरात चार दिवसांत झालेली धाडसी घरफोडीची ही दुसरी घटना होय. खामल्यातील एका डॉक्टरच्या निवासस्थानाहून चोरट्यांनी आठ लाखांची रोकड पळविली होती. अद्याप त्याचा छडा लागलेला नाही.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी