शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

ब्रान्डेड बॉटलमध्ये भरली जात होती स्वस्त दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:18 IST

बेलतरोडी येथील गोटाळ पांजरी येथील एका फ्लॅटमध्ये धाड टाकून पोलिसांनी नकली दारू बनविणारा अड्डा उघडकीस आणला. येथे ब्रान्डेड विदेशी दारूच्या रिकाम्या बॉटलमध्ये मध्य प्रदेशातील स्वस्त दारू भरली जात होती. पोलिसांनी येथून तीन आरोपींना अटक केली.

ठळक मुद्देनागपूरच्या बेलतरोडीतील गोटाळ पांजरी येथील अड्ड्यावर धाड : तीन आरोपी अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेलतरोडी येथील गोटाळ पांजरी येथील एका फ्लॅटमध्ये धाड टाकून पोलिसांनी नकली दारू बनविणारा अड्डा उघडकीस आणला. येथे ब्रान्डेड विदेशी दारूच्या रिकाम्या बॉटलमध्ये मध्य प्रदेशातील स्वस्त दारू भरली जात होती. पोलिसांनी येथून तीन आरोपींना अटक केली.पवन गोवर्धनदास जुमनानी (२२) रा. राजनांदगाव, लालबाग सिंधी कॉलनी, अजय अनिंद्र भालाधरे (२२) रा. गोंदिया आणि अंजार हक ऊर्फ समीर वाहिदुल हक (२६) रा. लोधीपुरा, गणेशपेठ, अशी आरोपींची नावे आहेत. बेलतरोडी पोलिसांना गोटाळ पांजरीमधील कस्तुरीनगर येथील अपार्टमेंटमधील ५ नंबरच्या फ्लॅटमध्ये नकली दारूच्या पॅकिंगचा अड्डा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तलवारे यांच्या नेतृत्वात शनिवारी मध्यरात्री ३ वाजता फ्लॅटवर धाड टाकण्यात आली. आरोपींनी हा फ्लॅट लता सिंह बैस यांच्याकडून भाड्याने घेतला होता. धाडीदरम्यान ब्रान्डेड विदेशी दारूच्या रिकाम्या बॉटलमध्ये मध्य प्रदेशातील बॉम्बे स्पेशल व्हिस्की नावाची स्वस्त दारू भरली जात होती. यासोबतच ब्रान्डेड दारूच्या बॉटलमध्ये कॉफीच्या कलर ड्रॉपरच्या मदतीने रंग टाकले जात होते. या अड्ड्यावर प्लास्टिक आणिअ‍ॅल्युमिनियमची झाकणे मोठ्या प्रमाणावर आढळून आली. ब्रान्डेड बॉटलमध्ये स्वस्त दारू टाकून त्यात रंग मिसळवून दारूचा रंग देण्याचा प्रयत्न केला जात होता. अड्ड्यावरून रिकाम्या बॉटल, नेस कॉफीचे पॅकेट, ब्रान्डेड दारूचे लेबल, झाकण आणि ड्रॉपरसह लिक्विड, कत्था, मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण ४ लाख ४२ हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला. आरोपींची कार, बाईकसुद्धा जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप साळुंखे, हवालदार अविनाश ठाकरे, विजय श्रीवास, गोपाल देशमुख, रितेश ढेंगे, सुरेंद्र पगारे, मिलिंद पटले, नितीन बावणे, प्रशांत सोनुलकर, कुणाल लांडगे आदींनी केली.दारू तस्करीचे आरोपी अटकेत : विदेशी दारूच्या २५ पेट्या जप्तनागपूरवरून वर्धेला दारूची तस्करी करणाऱ्या दोन आरोपीस अजनी पोलिसांनी वर्धेतून अटक केली.जुनेद शेख करीम शेख (२१) रा. वर्धा आणि गाडी चालक संजय ऊर्फ लाल सुनीलराव बाराहो (२९) रा. सेलू अशी आरोपीची नावे आहे. बुधवारी रात्री अजनी पोलिसांची चमू पीएसआय एस.बी. चप्पे यांच्या नेतृत्वात गस्त घालत होती. यादरम्यान कार क्रमांक एमएच/०२/बीजी/१६७० मधून नरेंद्र चौकातून मोठ्या प्रमाणावर विदेशी दारू वर्धेला नेली जात असल्याची माहिती या टीमला मिळाली. पोलीस नरेंद्रनगरातील श्रीनगर चौकात नजर ठेवून होते. दरम्यान त्यांना संबंधित कार दिसून आली तेव्हा त्याला थांबण्याचा इशारा केला. परंतु कार चालक गाडी न थांबवता पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करून कारला पकडले. आरोपी कार सोडून पळाले. करमधून बीअर आणि विदेशी दारूच्या २५ पेट्या जप्त करण्यात आल्या. कारच्या आधारावर पोलिसांनी फरार आरोपीचा शोध घेतला. गुरुवारी त्यांना वर्धेतील वॉर्ड नंबर १५ येथून जुनेद व सेलू येथून वाहन चालक संजयला अटक करून नागपूरला आणले.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीraidधाडArrestअटक