शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

BrahMos Information Leak: पाकिस्तानने खेळला दुहेरी डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 10:43 IST

दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताच्या हृदयस्थळी हल्ला करण्याचे अनेक वर्षांपासून कलुषित मनसुबे बाळगणाऱ्या पाकिस्तानने सुंदर ललना आणि डॉलर्सचे आमिष दाखवून पाकिस्तान (आयएसआय)ने एका तरुण शास्त्रज्ञाला फितुरी करण्यास भाग पाडले.

ठळक मुद्देशास्त्रज्ञाला फितवले मिसाईलच्या निर्मितीस्थळी घुसखोरीभारताच्या हृदयस्थळाला छेद देण्याचा प्रयत्न

- नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताच्या हृदयस्थळी हल्ला करण्याचे अनेक वर्षांपासून कलुषित मनसुबे बाळगणाऱ्या पाकिस्तानने सुंदर ललना आणि डॉलर्सचे आमिष दाखवून पाकिस्तान (आयएसआय)ने एका तरुण शास्त्रज्ञाला फितुरी करण्यास भाग पाडले. या माध्यमातून आयएसआयने भारताला शह देण्याचा दुहेरी डाव खेळला आहे. एकीकडे भारताच्या सर्वाधिक शक्तिशाली मिसाईलच्या प्लँटमध्ये घुसखोरी केली आहे तर, दुसरीकडे निशांत अग्रवाल नामक हेराच्या माध्यमातून भारताच्या हृदयस्थळालाही आयएसआयने छेदण्याचा प्रयत्न केला आहे. ब्राह्मोस हेरगिरी प्रकरणाचा खळबळजनक उलगडा झाल्याने हादरलेल्या सुरक्षा यंत्रणांमध्ये तपासासोबतच गंभीर मंथनही सुरू झाले आहे.कधी काश्मिरात, कधी सिमेपलिकडून हल्ले करून तर कधी घुसखोरी करून उपद्र्रवी पाकिस्तान भारतात नेहमी अस्वस्थता निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतो. भारतातील अन्य काही शहरांप्रमाणे भारताचे हृदयस्थळ अर्थात् नागपूर, पाकिस्तान आणि आयएसआयच्या हस्तक असलेल्या दहशतवादी संघटनांच्या आधीपासूनच हिटलिस्टवर आहे. हृदयावरचा हल्ला संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम करणारा ठरतो. हे जाणून असल्यामुळे पाकिस्तानने नागपुरातील संवेदनशील स्थळांना आधीच टार्गेट (अधोरेखित) केलेले आहे. दहा वर्षांपूर्वी पाकिस्तानी अतिरेक्यांनी संघ मुख्यालयावर हल्ला चढवला होता. हा हल्ला परतवून पाकिस्तान तसेच दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा यंत्रणांनी तोंडघशी पाडल्यामुळे नागपुरात हल्ला करण्याचे कट वेगवेगळ्या पद्धतीने रचले जात आहे. डीआरडीओच्या ब्रह्मोस एअरोस्पेस प्लँटमध्ये आपला हेर घुसवून पाकिस्तानने दुहेरी डाव साधला आहे. जाणते-अजानतेपणाने निशांत अग्रवालकडून पाकिस्तानने भारतासोबत फितुरी करण्याचे पातक घडवून आणले आहे. निशांत त्याचा हैदराबादेतील मित्र अब्राहम तसेच कानपुरातील पुन्हा एक वरिष्ठ महिला अधिकारी यांच्याकडून ब्रह्मोस संदर्भात अत्यंत संवेदनशील माहिती आयएसआयने काढून घेतली आहे. त्याची जबर किंमत भारतीय शास्त्रज्ञ आणि सुरक्षा दलाला मोजावी लागणार आहे. दरम्यान, निशांत अग्रवालला उत्तर प्रदेश एटीएसचे पथक आज नागपुरातून लखनौला घेऊन गेले. तिकडे उत्तर प्रदेशमधील अलीपूरद्वार जिल्ह्यातील आणखी एका एजंटला बुधवारी तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. कानपुरातील एका महिला अधिकाऱ्याकडून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणातील कोडवर्डमधील गुपित जाणून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचे संबंधित सूत्रांचे सांगणे आहे.

महाराष्ट्राच्या सुरक्षा यंत्रणांची गोचीनेहमीच दबावतंत्राचा वापर करून भारताला दडपण्याचे धोरण अवलंबणारा अमेरिका आणि भारताला सर्वात मोठा शत्रू मानणारा पाकिस्तान महाराष्ट्राच्या उपराजधानीत आपला हेर पेरतात. तो अनेक महिन्यांपासून येथे सक्रिय असतो आणि राज्याच्या तपास यंत्रणांना त्याचा थांगपत्ताही लागत नाही. ही बाब महाराष्ट्राची सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांची गोची करणारी ठरली आहे. नागपुरात एसआयडी, सीआयडी, एएनओ तसेच एटीएससारखी तपास पथके आणि त्यांची स्वतंत्र कार्यालये आहेत. मात्र, हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. गृह मंत्रालय आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये त्याची गंभीर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते. उत्तर प्रदेशातील तपास यंत्रणांनी पाकिस्तानी हेराला अटक केल्यामुळे राज्याच्या अन् खास करून नागपुरातील तपास यंत्रणा खजिल झाल्यासारख्या झाल्या आहेत. महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणांना का नाही लागला आयएसआयच्या नागपुरातील नेटवर्कचा छडा, अशी विचारणा अनेकांकडे होत आहे. गृह मंत्रालयातून या संबंधाने लवकरच ‘आॅडिट’ केले जाणार असल्याचेही वरिष्ठ सूत्रांचे सांगणे आहे.

टॅग्स :Brahmos Missileब्राह्मोसPakistanपाकिस्तानIndiaभारत