शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

लो होल्टेजमुळे जवानांचा वाढला बीपी, रोखली 'आर्मी स्पेशल ट्रेन'

By नरेश डोंगरे | Updated: July 25, 2023 21:05 IST

अनेक तासांपासून पंखे अन् एसीही बंद : नागपूर यार्डात झाली दुरूस्ती : ११ तासांनंतर रवाना

नागपूर : बंद पडलेले पंखे, एसी सुरू होण्याचे नाव घेत नसल्याने सैन्य दलाच्या जवानांचा रोष उफाळून आला. नागपूर रेल्वेस्थानक येताच त्यांनी ही 'आर्मी स्पेशल ट्रेन' रोखून धरली. तब्बल ११ तासांच्या दुरूस्तीनंतर सैन्याच्या जवानांनी भरलेली 'आर्मी स्पेशल' पुढच्या प्रवासाला रवाना झाली.

लष्कराच्या जवानांनी भरलेली विशेष रेल्वेगाडी सोमवारी रात्री सिकंदराबादहून जम्मूकडे निघाली. सिकंदराबादपासून काही अंतर पार करत नाही तोच गाडीतील लाईट, पंखे, एसी, चालू-बंद होऊ लागले. काही वेळेनंतर कमी पॉवर (लो होल्टेज)मुळे विजेवर चालणारी सर्व उपकरणे असून नसल्यासारखी झाली. प्रचंड उकाड्यामुळे सैन्यातील अधिकारी, जवान घामाघुम होऊन प्रचंड अस्वस्थ झाले. आता होईल, थोड्या वेळानंतर सुरळीत होईल, असे वाटत असल्याने जवानांनी हा त्रास सहन केला.

मात्र, पाच ते सात तास होऊनही एसीच काय साधा पंखाही सुरू होत नसल्याने जवानांचा रोष उफाळून आला. मंगळवारी सकाळी ६.५८ वाजता ही आर्मी स्पेशल नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर आली. त्यानंतर गाडीतील मेजर यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधिकाऱ्यांनी तातडीने अभियंत्यांना पाचारण केले. नेमका काय बिघाड आहे, ते शोधून काढण्याचे आदेश मिळाले. पाहणीत या गाडीच्या बऱ्याचशा बॅटरीज खराब असल्याने 'लो होल्टेज'ची समस्या निर्माण झाली आणि त्याचमुळे एसीसह सर्व उपकरणे निकामी झाल्याचे स्पष्ट झाले. परिणामी तातडीने दुरूस्ती सुरू करण्यात आली. तब्बल ११ तासांच्या परिश्रमानंतर रेल्वेगाडीतील बिघाड दुरूस्त करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ६.२८ वाजता ही आर्मी स्पेशल जम्मूकडे रवाना झाली.

'जय हिंद'चा नारा अन् जोशात घेतला निरोपट्रेनला दुरूस्तीसाठी तब्बल ११ तास लागले. तरीसुद्धा जवानांनी कोणतीही आगळीक केली नाही. ते सर्व शांतपणे दुरूस्तीच्या कामाकडे बघत होते. आमची काही मदत होऊ शकते का, अशीही त्यांनी या दरम्यान अनेकदा रेल्वे अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. दुरूस्ती होऊन ट्रेन निघायला सज्ज असताना जवानांनी रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले. एकसाथ 'जय हिंद'चा जोरदार नारा लावून त्यांनी मोठ्या जोशात नागपूरकरांचा निरोप घेतला.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानnagpurनागपूर