शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉटस्अ‍ॅपमुळे मिळाला हरवलेला मुलगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 01:01 IST

कळमेश्वर येथील हरविलेला एक शाळकरी मुलगा व्हॉटस्अ‍ॅपमुळे त्याच्या घरी पोहचला. त्याला त्याच्या घरचा पत्ता शोधून देण्यासाठी इंदूरच्या (मध्य प्रदेश) एका सेवाभावी तरुणाने मोलाची भूमिका वठविली. या तरुणाने प्रसंगावधान राखत नकळत इंदूरला पोहचलेल्या मुलाचा व्हिडीओ बनवून तो व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल केला. तो एका व्यक्तीने लक्षात आणून दिल्यानंतर मानकापूर पोलिसांनी सतर्कता दाखवत त्या युवकाशी संपर्क साधून मुलाच्या नातेवाईकांना इंदूरला रवाना केले.

ठळक मुद्देइंदूरच्या तरुणाचे प्रसंगावधान : मानकापूर पोलिसांनीही दाखविली सतर्कता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमेश्वर येथील हरविलेला एक शाळकरी मुलगा व्हॉटस्अ‍ॅपमुळे त्याच्या घरी पोहचला. त्याला त्याच्या घरचा पत्ता शोधून देण्यासाठी इंदूरच्या (मध्य प्रदेश) एका सेवाभावी तरुणाने मोलाची भूमिका वठविली. या तरुणाने प्रसंगावधान राखत नकळत इंदूरला पोहचलेल्या मुलाचा व्हिडीओ बनवून तो व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल केला. तो एका व्यक्तीने लक्षात आणून दिल्यानंतर मानकापूर पोलिसांनी सतर्कता दाखवत त्या युवकाशी संपर्क साधून मुलाच्या नातेवाईकांना इंदूरला रवाना केले. प्रथमेश ऊर्फ आयुष्य बोरकर (वय १३) असे त्याचे नाव असून, तो कळमेश्वर जवळच्या कन्याढोल येथील रहिवासी आहे. मंगळवारी मानकापूर येथील एका सद्गृहस्थाने मानकापूर पोलिसांना व्हॉटस्अ‍ॅपवर एक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे सांगून, एक तरुण एका अल्पवयीन मुलाबद्दल माहिती देत आहे. हा मुलगा झिंगाबाई टाकळी येथील असल्याचे तो सांगत असल्याचेही त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले. पोलीस शिपाई प्रमोद दिघोरे यांनी ही माहिती वरिष्ठांना कळविली. त्यांनी नागपुरात व्हिडीओ व्हायरल करून हरविलेल्या मुलाबाबत सविस्तर माहिती मिळविली. त्यामुळे या मुलाचे नाव प्रथमेश असून तो कन्याढोल (ता. कळमेश्वर) येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. हा व्हिडीओ इंदूर (मध्य प्रदेश) येथील विशाल पाटील नावाच्या तरुणाने तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने मानकापूर पोलिसांनी पाटीलसोबत संपर्क केला. शिपाई प्रमोदने प्रथमेशच्या नातेवाईकांची माहिती घेऊन त्याचे काका रंजन विनायक गजभिये (रा. सावनेर) यांनाही फोनवर माहिती कळविली. त्यांना तो व्हिडीओ दाखविला असता हा प्रथमेशच असून, तो आपला नातेवाईक असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचे नातेवाईक लगेच प्रथमेशला घेण्याकरिता इंदूरकडे निघाले. तत्पूर्वी पोलिसांनी नातेवाईक आणि प्रथमेशचे फोनवर बोलणे करून दिले. कुठलीही माहिती नसताना फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून एका हरविलेल्या मुलाचा शोध लागल्याने पोलीस तसेच त्याच्या नातेवाईकांनी आनंद व्यक्त केला आहे. मानकापूरचे ठाणेदार वजीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनीष वाकोडे, फौजदार विजय नाईक, हवालदार सुनील मिलमिले, नायक इस्माईल, स्वप्निल शीतलाप्रसाद पांडे, आकाश राजेंद्र देवेकर यांनी ही प्रशंसनीय कामगिरी बजावली.

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपMissingबेपत्ता होणं