शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

यंदा पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:08 IST

समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क पुस्तकांचे वाटप करण्यात येते. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालय व नागपूर महापालिका शिक्षणाधिकारी कार्यालयाने २०१९-२० या वर्षासाठी ५३,३६,०७३ पुस्तकाची मागणी केली होती. या मागणीनुसार बालभारतीच्या पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्रातर्फे ७ जून रोजी १०० टक्के पुस्तकांचा पुरवठा झाला आहे.

ठळक मुद्देबालभारतीकडून नागपूर विभागात ५३ लाख पुस्तकांचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क पुस्तकांचे वाटप करण्यात येते. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालय व नागपूर महापालिका शिक्षणाधिकारी कार्यालयाने २०१९-२० या वर्षासाठी ५३,३६,०७३ पुस्तकाची मागणी केली होती. या मागणीनुसार बालभारतीच्या पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्रातर्फे ७ जून रोजी १०० टक्के पुस्तकांचा पुरवठा झाला आहे.नागपूर विभागातील शाळा २६ जूनपासून सुरू होणार आहे. हा पुस्तकांचा पुरवठा जिल्हा परिषद, नगर परिषद, अनुदानित व महापालिकेच्या शाळांना होणार आहे. बालभारतीच्या पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्रातर्फे तालुकानिहाय पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. ५३ लाख ३६ हजार ७३ पुस्तकांच्या प्रतीची किंमत २२ कोटी ९१ लाख ५२ ह जार ४८६ रुपये आहे. पुस्तक पुरवठा झाल्यासंदर्भातील माहिती वितरण केंद्रातर्फे शिक्षण उपसंचालक कार्यालय व प्रत्येक शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.सर्वशिक्षा अभियानांतर्गत मोफत देण्यात येणाऱ्या पुस्तकांचा काळाबाजार होऊ नये म्हणून प्रत्येक पुस्तकावर बारकोड लावण्यात आले आहे. तसेच या पुस्तकांवर छापील किंमत देण्यात आलेली नाही. शाळा सुरू होण्याच्या २० दिवसांपूर्वी पुस्तके तालुक्यावर पोहचल्याने यंदा पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील, अशी अपेक्षा आहे.जिल्हानिहाय पुरवठानागपूर ९,५८,४६९भंडारा ६,१७,५७१वर्धा ५,३२,९८८चंद्रपूर १०,०७,७४५गडचिरोली ६,३४,४८६गोंदिया ६,९१,२६४नागपूर (मनपा) ८,९३,५५०राज्य शिक्षण मंडळाच्या ९ ते १२ वर्गाची पुस्तके बाजारातराज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाच्या ९ ते १२ वर्गाच्या पुस्तकांचे वितरण बालभारती करते. ही पुस्तके बाजारपेठेतून विद्यार्थ्यांना घ्यावी लागतात. ही पुस्तकेही बाजारपेठेत पोहचली आहे. तसेच १ ते ८ वर्गाच्या विनाअनुदानित शाळेत मोफत पुस्तके पुरवण्यात येत नाही. अशा विनाअनुदानित शाळेत शिकणाऱ्या १ ते ८ च्या विद्यार्थ्यांचीही पुस्तके बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर