शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

T20 World Cup 2021 Ind vs Pak : विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात बुकींची बल्लेबल्ले; सुरुवातीच्या डावात पंटर्स कंगाल, बुकी मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 01:14 IST

सामन्यापूर्वी भारताला कल, सहा ओव्हरमध्ये गणित गडबडलं! टॉसचं गणितही चुकलं...

नरेश डोंगरे -

नागपूर - जगभरातील कोट्यवधी क्रिकेट प्रेमींना दिवाळीची अनुभूती देणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) सामन्याला रविवारी सुरुवात झाली. पारंपरिक शत्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) क्रिकेट संघातच सलामीचा (पहिला) सामना होणार असल्याने बुकींनी भारताला कल दिला होता. परंतु, सहा ओव्हरमध्येच बुकी बाजार (Bookie Market) गडबडला. कोट्यवधींची उलटफेर करणारे पंटर कंगाल अन् बुकी मालामाल झाले. 

भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यादरम्यान देशभरात हजारो कोटींचा सट्टा लागतो. त्यामुळे टी-२० च्या सामन्याच्या निमित्ताने स्थानिक बुकींनी दिवाळीआधीच जोरदार आतिशबाजीची तयारी चालवली होती. देशाचे सेंटर पॉईंट असलेल्या नागपुरातून मध्यभारतातील बुकी बाजार संचलित केला जातो. छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवाच नव्हे, तर दुबईत बसलेले बुकीही नागपूर सेंटरच्या सट्ट्याला कनेक्ट असतात. २००७ मध्ये पाकिस्तानला नमवून टी-२० चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारताला बुकींनी आजच्या सामन्यातही विजयाचे दर दिले होते. संबंधित सुत्रांच्या माहितीनुसार, सामना सुरू होण्याच्या एक तासापूर्वी नागपुरातून २०० कोटींची लगवाडी होण्याचे संकेत बुकींना मिळाले होते. बुकींच्या ऑनलाइन बेटिंगचे प्लेटफॉर्म बेट ३६५ आणि लँडब्रोक्सनुसार, बुकींच्या नजरेत यावेळचा विश्वचषक विजेता भारतच असल्याने सामना सुरू होण्यापूर्वी भारताच्या बाजूने कल देत बुकींना आजच्या सामन्याचा रेट ५७, ५८ ठेवला होता. नंतर भारताच्या बाजूनेच ६०-६२ चा रेट आला. मात्र, ६ ओव्हरमध्येच बुकीबाजार गडबडला. भारताने अवघ्या ३ धावांवर रोहित शर्माची, नंतर केएल राहुल आणि त्यानंतर सूर्यकुमार अशा तीन विकेट गमविल्यामुळे बुकींना पाकिस्तानला फेवर केले. त्यामुळे पाकिस्तानच्या बाजूने ७६-७८ असा रेट गेला. नंतर मात्र ११ ओव्हरमध्ये ६६ धावा बनवून भारताने पुन्हा बुकींना आपल्याकडे आकर्षित केले. त्यामुळे भारतावर ८८-८९ असा दर दिला गेला. पहिली खेळी संपली तेव्हा १५१ धावांची पावती फाडून भारताने ७ विकेट गमावल्या होत्या. तोपर्यंत बुकीबाजारात ३०० कोटींपर्यंतच्या सट्ट्याची लगवाडी झाल्याचे सांगितले जात होते.

टॉसचे गणित चुकलेनाव न छापण्याच्या अटीवर एका बड्या बुकींनी लोकमतशी बोलताना त्यांचे पहिले गणित चुकल्याचे सांगितले. टॉस भारत जिंकेल, असा बुकींचा अंदाज होता. मात्र, तो चुकला. टॉस पाकिस्तानने जिंकला. त्यामुळे प्रारंभीपासूनच फंटर्सचे (लगवाडी करणारे) नुकसान झाले.

बुकींच्या नजरेत ‘टॉप सेव्हन’ -बुकींच्या मतानुसार विश्वचषकाच्या दावेदारीत भारत आणि इंग्लंड प्रमुख प्रतिस्पर्धी राहतील. कारण भारतानंतर सर्वाधिक सट्टा इंग्लंडवरच लागला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला बुकींनी स्थान दिले आहे. सर्वात कमकुवत टीम म्हणून बुकींच्या नजरेत दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे.

हेही वाचा - - १९ ठिकाणी छापेमारी, डझनभर बुकी ताब्यात; पहिल्याच सामन्यात क्रिकेट सट्ट्याचा डाव उधळला! 

टॅग्स :T20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१T20 Cricketटी-20 क्रिकेटCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान