शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

नागपूर विभागात विद्यार्थ्यांवर बरसले ‘बोनस’ गुण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 01:36 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक शाळांमध्ये ‘सेलिब्रेशन’चे वातावरण होते. परीक्षेच्या निकालात कला, क्रीडा यासाठी देण्यात आलेल्या अतिरिक्त गुणांमुळे विद्यार्थ्यांवर अक्षरश: गुणांचा वर्षाव झालेला दिसून आला. यामुळे शहरातील अनेक विद्यार्थ्यांना चक्क ९९ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त झाले तर बऱ्याच जणांनी तर ९८ टक्क्यांहून अधिक मजल मारली. शहरातील सुमारे २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त झाले. ‘मान्सून’च्या सुरुवातीला झालेल्या या गुणांच्या पावसामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

ठळक मुद्देअनेक विद्यार्थ्यांना ९९ टक्क्यांहून अधिक गुण : टक्केवारीत मुलींचीच बाजी : हजारो विद्यार्थी नव्वदीच्या घरात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक शाळांमध्ये ‘सेलिब्रेशन’चे वातावरण होते. परीक्षेच्या निकालात कला, क्रीडा यासाठी देण्यात आलेल्या अतिरिक्त गुणांमुळे विद्यार्थ्यांवर अक्षरश: गुणांचा वर्षाव झालेला दिसून आला. यामुळे शहरातील अनेक विद्यार्थ्यांना चक्क ९९ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त झाले तर बऱ्याच जणांनी तर ९८ टक्क्यांहून अधिक मजल मारली. शहरातील सुमारे २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त झाले. ‘मान्सून’च्या सुरुवातीला झालेल्या या गुणांच्या पावसामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.यंदाही उत्तीर्णांच्या उपराजधानीत विद्यार्थिनींचाच वरचष्मा दिसून आला. जर विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त गुणांविना टक्केवारी लक्षात घेतली तर सोमलवार हायस्कूल रामदासपेठ येथील केतकी राजूरकर व प्रणाली तितरे यांनी ९८.६० टक्के (४९३) गुण मिळवित प्रथम स्थान पटकाविले. तर सोमलवार हायस्कूल, खामला येथील विद्यार्थिनी शंकरी खोकले हिने ९८.४० टक्के (४९२) गुण प्राप्त करत दुसरे स्थान मिळविले. सोमलवार हायस्कूल, रामदासपेठ येथील संयुक्ता मन्सुरे, सृष्टी आंबुलकर व पं.बच्छराज व्यास महाविद्यालयाचा विद्यार्थी विकास चुटे हे प्रत्येकी ९८.२० टक्के (४९१) गुणांसह तृतीय क्रमांकावर आले.नागपूर जिल्ह्याच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर ३०,८८२ पैकी २७,७५५ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ८९.८७ टक्के इतके आहे. तर जिल्ह्यातून ८२.८६ टक्के मुले उत्तीर्ण झाली. संपूर्ण जिल्ह्याचा एकूण निकाल ८६.२९ टक्के इतका राहिला. मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याचा निकाल १.४७ टक्क्यांनी वाढला.शहरात ८६ टक्क्यांहून अधिक उत्तीर्णनागपूर शहरात १८,२१६ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. त्यापैकी १६,३२७ म्हणजेच ८९.६२ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. तर १८,५८० पैकी १५,४२३ (८३.०१ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शहरातील एकूण उत्तीर्णांचे प्रमाण हे ८६.२९ टक्के इतके आहे.टॉपर्स विद्यार्थीक्रमांक   नाव                                      शाळा                                         टक्के१            केतकी राजूरकर                सोमलवार हायस्कूल,रामदासपेठ     ९८.६०%१              प्रणाली तितरे                      सोमलवार हायस्कूल,रामदासपेठ   ९८.६०%२               शंकरी खोकले                   सोमलवार हायस्कूल, खामला       ९८.४०%३             संयुक्ता मन्सुरे                    सोमलवार हायस्कूल,रामदासपेठ      ९८.२०%३            सृष्टी आंबुलकर                    सोमलवार हायस्कूल,रामदासपेठ      ९८.२०%४               विकास चुटे                      पं.बच्छराज व्यास विद्यालय               ९८.२० %जिल्ह्यातील उत्तीर्णांची टक्केवारीसहभागी                                उत्तीर्ण                                   टक्केवारीविद्यार्थी ३२,१९०                    २६,६७२                               ८२.८६विद्यार्थिनी ३०,८८२                  २७,७५५                            ८९.८७एकूण ६३,०७२                    ५४,४२७                             ८६.२९गुणपडताळणीसाठी १८ जूनपर्यंत अर्जयंदापासून निकालाच्या दुसºया दिवशीपासूनच गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुणपडताळणीसाठी गुणपत्रिके्च्या स्वसाक्षांकीत प्रतीसह ९ जून ते १८ जून या कालावधीत अर्ज करता येईल तर छायाप्रतीसाठी २८ जूनपर्यंत अर्ज करता येईल. छायाप्रत मिळाल्यापासून ५ दिवसात पूनर्मूल्याकंनासाठी अर्ज करावा लागणार आहे.सिद्धार्थ उमाठे दिव्यांगांमधून ‘टॉप’शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बी.आर.ए.मुंडले इंग्लिश मीडियम शाळेचा विद्यार्थी सिद्धार्थ उमाठे हा ९१.२१ टक्के गुणांसह दिव्यांगांमधून विदर्भात प्रथम आला. तर कुर्वेज न्यू मॉडेल हायस्कूलची विद्यार्थिनी आरती मानमोडे हिने ९०.६० टक्के गुणांसह दुसरा तर भावेश आंबोलीकर याने ८१.६० टक्के गुणांसह तृतीय स्थान पटकाविले.

 

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८nagpurनागपूर