शहरं
Join us  
Trending Stories
1
"रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
2
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
3
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
4
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
5
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
6
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
7
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
8
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
9
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
10
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
11
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
12
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
13
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
14
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
15
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
16
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
17
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
18
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
19
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

एसीएफच्या नावाने बोगस ‘हॅमर’

By admin | Published: July 26, 2016 2:20 AM

एका खासगी ठेकेदाराने चक्क नागपूर वन विभागातील एका सहायक वनसंरक्षक (एसीएफ) अधिकाऱ्याच्या नावे बोगस..

गुन्हा दाखल करण्याचे निर्देश : कोट्यवधीच्या सागवानाची अवैध कटाई जीवन रामावत नागपूरएका खासगी ठेकेदाराने चक्क नागपूर वन विभागातील एका सहायक वनसंरक्षक (एसीएफ) अधिकाऱ्याच्या नावे बोगस ‘हॅमर’ तयार करून कोट्यवधीच्या सागवान लाकडाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मात्र असे असताना संबंधित ठेकेदार अजूनही खुलेआम मोकाट फिरत आहे. या प्रकरणाची हकीकत अशी की, मागील डिसेंबर २०१५ मध्ये नागपूर वन विभागाच्या हिवरा राऊंडमधील वरघाट बिटातील मौजा सवेंद्री सर्वे क्र. ७८ येथील ५२ सागाच्या झाडांची अवैध कटाई झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्याआधारे नागपूरच्या तत्कालीन उपवनसंरक्षक ज्योयतो बॅनर्जी यांनी सहायक वनसंरक्षक वीरसेन यांच्यावर या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी दिली होती. परंतु वीरसेन यांची लगेच वनभवन येथे बदली झाली. त्यामुळे ती चौकशी विभागीय वन अधिकारी (दक्षता) केवल डोंगरे यांच्याकडे सोपविण्यात आली. यानंतर त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली. दरम्यान,त्यांना एका खासगी ठेकेदाराने सोनवणे नावाच्या शेतकऱ्याकडून सागाची झाडे खरेदी करून, त्यांची विनापरवानगी अवैध कटाई केल्याचे निदर्शनास आले. वन विभागाने केला ‘हॅमर’ जप्त नागपूर : तसेच त्या सर्व झाडांवर सहायक वनसंरक्षक राठोड यांचा ‘हॅमर’ आढळून आला. शिवाय संबंधित ठेकेदाराने वन विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने ती अवैध सागवान कटाई केल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले होते. त्यानुसार डोंगरे यांनी आपला चौकशी अहवाल तयार करून तो वरिष्ठांकडे सादर केला. त्याआधारे तत्कालीन पवनी येथील वनपाल फुले यांना तत्काळ निलंबित करण्यात आले होते. तसेच एसीएफ राठोड व वन परिक्षेत्र अधिकारी कहलुके यांच्यावरही गंभीर ठपका ठेवण्यात आला होता. तसेच तो ‘हॅमर’ जप्त करून त्याला परीक्षणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला होता. वन अधिकाऱ्यांच्या मते, अलीकडेच त्या ‘हॅमर’चा अहवाल नागपूर वन विभागाकडे प्राप्त झाला असून, तो ‘हॅमर’ सहायक वनसंरक्षक राठोड यांचा नव्हताच, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागपूर वन विभागाने आता संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या हालाचाली सुरू करून त्यासंबंधी निर्देशही जारी केले असल्याची माहिती एका वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी दिली. मात्र त्या निर्देशासंबंधी पवनी येथील वन परिक्षेत्र अधिकारी कहलुके यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली असता, त्यांनी अजूनपर्यंत आपल्याकडे असे कोणतेही निर्देश प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. यावरून नागपूर वन विभाग संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालून त्याचा बचाव करीत असल्याचे दिसून येत आहे.(प्रतिनिधी) अद्यापही ठेकेदार मोकाट का?माहिती सूत्रानुसार नागपूर वन विभागाला सुमारे १५ दिवसांपूर्वी त्या ‘हॅमर’चा अहवाल प्राप्त झाला आहे. शिवाय नागपूर वन विभाग संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासंबंधी निर्देश जारी केले असल्याचे सांगत आहे. परंतु प्रत्यक्षात अजूनपर्यंत संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला नसून, ठेकेदार हा मोकाट फिरत आहे. यावरून नागपूर वन विभाग हा बनवाबनवी करून, संबंधित ठेकेदाराची पाठराखण करीत आहे. वन विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून, त्याला अटक झाल्यास या प्रकरणातील फार मोठे घबाड बाहेर येणार आहे. तसेच संबंधित ठेकेदाराने तोंड उघडल्यास अनेक वन अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा गजाआड होऊ शकतात. त्यामुळे संबंधित ठेकेदाराचा बचाव केला जात आहे.