शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बोगस जमातींनी लाटला हलबांच्या सवलतीचा लाभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 20:42 IST

संविधानाने देशातील सुविधांपासून वंचित राहिलेल्या खऱ्या हलबा-हलबी जमातींना आरक्षणाच्या यादीत समाविष्ट केले होते. मात्र राज्य शासनाने जात पडताळणीअंतर्गत सुरू केलेल्या स्क्रुटीनी कमिटीच्या माध्यमातून पूर्वाश्रमीच्या सवर्ण असलेल्या जमातींनी बोगस प्रमाणपत्राद्वारे अनुसूचित जमाती (एसटी)च्या सवलतीचा लाभ घेतला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने एसटी गटात मोडणाऱ्या जातींचे नव्याने सर्वेक्षण करावे, या मागणीसाठी हलबा जमात समितीच्या माध्यमातून बापुकुटी ते दीक्षाभूमीपर्यंत पदयात्रा काढण्यात आली.

ठळक मुद्देनव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी : बापुकुटी ते दीक्षाभूमी पदयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संविधानाने देशातील सुविधांपासून वंचित राहिलेल्या खऱ्या हलबा-हलबी जमातींना आरक्षणाच्या यादीत समाविष्ट केले होते. मात्र राज्य शासनाने जात पडताळणीअंतर्गत सुरू केलेल्या स्क्रुटीनी कमिटीच्या माध्यमातून पूर्वाश्रमीच्या सवर्ण असलेल्या जमातींनी बोगस प्रमाणपत्राद्वारे अनुसूचित जमाती (एसटी)च्या सवलतीचा लाभ घेतला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने एसटी गटात मोडणाऱ्या जातींचे नव्याने सर्वेक्षण करावे, या मागणीसाठी हलबा जमात समितीच्या माध्यमातून बापुकुटी ते दीक्षाभूमीपर्यंत पदयात्रा काढण्यात आली.समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ७ जुलै रोजी बापुकुटी, सेवाग्राम येथून या पदयात्रेला सुरुवात केली. १०१ किलोमीटर पायी यात्रा करून १२ जुलै रोजी दीक्षाभूमी येथे या पदयात्रेचे समापन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष डॉ. सुशील कोहाड, संजय धकाते, केदारनाथ कुंभारे, दीपक कोहाड, दिलीप खडगी, दुर्गेश गडीकर, प्राचार्य योगेश गोन्नाडे, मनोज हेडाऊ, जयंत कुंभारे, सुशांत नंदनवार, पुरुषोत्तम सुलूकर, धानोरकर, महेंद्र हेडाऊ, रामेश्वर बुरडे, शरद सोनकुसरे, शांताराम निनावे यांच्यासह आमदार रमेशदादा पाटील हे पदयात्रेत सहभागी झाले होते. डॉ. सुशील कोहाड यांनी सांगितले की, समितीच्यावतीने १० वर्षे संशोधनात्मक अभ्यास केला असता पूर्वाश्रम सवर्ण असलेल्या सूर्यवंशी, ठाकूर वंशीय राजपुतांनी हलबा हलबींच्या सवलतींचा लाभ मिळविला आहे. हा घोटाळा लक्षात येऊ नये म्हणून विणकरी व्यवसाय स्वीकारलेल्या हलबा-हलबी यांच्यावर कोष्टी असल्याचा आळ घेतला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे उदरभरणासाठी विणकरी व्यवसाय स्वीकारलेल्या व कोष्टी जातीत मिसळलेल्या खऱ्या हलबा/हलबी जमातीवर अन्याय होत असल्याचे ते म्हणाले.ही बाब लक्षात यावी म्हणून समितीच्यावतीने ३० जूनला अभ्यासपूर्ण पुराव्यांसह ४५८ निवेदने महामहीम राष्ट्रपती व राज्यपाल यांच्यासह मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त नागपूर तसेच विविध जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याचे डॉ. कोहाड यांनी सांगितले. या घोटाळ्याची  चौकशी करून हलबा/हलबी जमातीतील कर्मचारी, विद्यार्थी आणि समाजावर झालेला अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे. शिवाय अनुसूचित जमातीमधील जातींचे नव्याने सर्वेक्षण करून वर्गवारी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. १७ पासून धरणे आंदोलनया घोटाळ्याची चौकशी व नव्याने सर्वेक्षणाच्या मागणीसाठी पदयात्रेनंतर येत्या १७ जुलैपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे डॉ. कोहाड यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा