शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

बोगस सॉल्व्हन्सी; सूत्रधाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By admin | Updated: July 29, 2016 02:57 IST

आरोपींच्या जामिनासाठी बोगस सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र उपलब्ध करून देणाऱ्या टोळीच्या सूत्रधाराचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी..

न्यायालयाची दिशाभूल : जामिनाच्या बनावट दस्तावेजांद्वारे आरोपी मोकाट नागपूर : आरोपींच्या जामिनासाठी बोगस सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र उपलब्ध करून देणाऱ्या टोळीच्या सूत्रधाराचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी पहिले तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. किरण लक्ष्मण रोडगे (४२) असे या सूत्रधाराचे नाव असून, तो जयताळा मार्गावरील एकात्मतानगर येथील रहिवासी आहे. किरण रोडगे हा बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट चालवायचा. आरोपींच्या जामिनासाठी सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र अत्यावश्यक दस्तावेज समजल्या जाते. रोडगेने उपलब्ध करून दिलेल्या बोगस सॉल्व्हन्सी प्रमाणपत्रांवर न्यायालयातून बरेच आरोपी जामिनावर सुटून मोकाट झाले आहेत. रोडगेने चक्क न्यायालयाची दिशाभूल केली आहे. (प्रतिनिधी) असे आले प्रकरण उजेडात कोतवाली पोलीस ठाण्याच्या भादंविच्या ४२०, ४६५, ४६७, ४७१, ४७२, ३४ गुन्ह्यातील आरोपी रविकांत गणेश खोब्रागडे याच्या जामिनाचा आदेश झाल्याने वकिलांनी जामिनदार म्हणून आरोपी सुरेश चमरू बंजारा (४२) रा. चंद्रनगर पारडी याला न्यायालयात हजर केले होते. या जामिनदाराचे सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र आणि इतर दस्तावेज न्यायालयात सादर करण्यात आले होते. हे दस्तावेज पडताळणीसाठी नायब तहसीलदारांकडे पाठविण्यात आले होते. सॉल्व्हन्सी प्रमाणपत्रावरील सही आणि शिक्के आपल्या कार्यालयातील नसून, हे प्रमाणपत्र आपल्या कार्यालयातून निर्गमित झालेले नाही, असा अहवाल न्यायालयाकडे पाठविण्यात आला होता. सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक ८ चे सहायक अधीक्षक वसंत ऋषी डोनाडकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून सदर पोलीस ठाण्यात १ जुलै २०१६ रोजी सुरेश चमरू बंजाराविरुद्ध भादंविच्या ४२०, ४६७, ४७१ कलमान्वये गुन्हा दाखल करून, त्याला ८ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. बंजारा याने चौकशीत हे प्रमाणपत्र माधव डोमाजी काचोरे, किरण रामराव रोडगे आणि एका एजंटने तयार करून दिल्याचे सांगितले होते. माधव काचोरे हा अन्य एका गुन्ह्यात कारागृहात असल्याने त्याला पोलिसांनी प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतले होते. पोलिसांनी किरण रोडगे याच्या एकात्मतानगर येथील घरी धडक दिली असता, तो फरार झालेला होता. रोडगेने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करताच सरकार पक्षाने जामिनास विरोध केला. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले बनावट रबरी स्टॅम्प जप्त करणे आहे, रबरी शिक्के आणि इतर दस्तावेज कोठे तयार केले, याबाबत तपास करणे आहे, असे न्यायालयाला सांगण्यात आले. जरीपटका पोलीस ठाण्यात दाखल भादंविच्या कलम ४१९, ४२०, ४६५, ४७१, ३४ अंतर्गतचा आरोपी दशरथ मिलाप शाहू याचा २८ जून रोजी अतिरिक्त सत्र न्यायालयातून जामीन आदेश झाला होता. या आरोपीचा जामीन घेण्यासाठी धंतोली फकिरावाडी येथील रवींद्र लक्ष्मण गायकवाड हा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात हजर झाला होता. त्याने सॉल्व्हंसी प्रमाणपत्र आणि इतर दस्तावेज न्यायालयात सादर केले होते. नायब तहसीलदार आभा बोरकर यांनी सॉल्व्हंसी प्रमाणपत्राची पडताळणी केली असता ते बनावट आढळून आले होते. लागलीच सदर पोलीस ठाण्यात भादंविच्या ४२०, ४६७, ४७१ रवींद्र गायकवाड आणि सिरसपेठ येथील माधव डोमाजी काचोरे यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी सॉल्व्हंसी प्रमाणपत्र किरण रोडगे याने तयार करून दिल्याचे बयाण पोलिसांकडे नोंदवले होते. आरोपी हा फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यात सहभागी असल्याचे प्रथम दर्शनी लक्षात येताच आरोपीची चौकशीसाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याने न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील वसंत नरसापूरकर यांनी काम पाहिले.