जात प्रमाणपत्रावर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बोगस सह्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 09:29 PM2020-10-10T21:29:52+5:302020-10-10T21:35:04+5:30

Fake Caste Certificates, Nagpur news जातीच्या ४ प्रमाणपत्रांवर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या ४ वेगवेगळ्या सह्या आढळून आल्या आहेत. आरटीई व्हेरिफिकेशन कमिटीच्या तपासणीत हा बोगसपणा उघडकीस आला आहे.

Bogus signature of resident deputy collector on caste certificate | जात प्रमाणपत्रावर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बोगस सह्या

जात प्रमाणपत्रावर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बोगस सह्या

googlenewsNext
ठळक मुद्देआरटीई व्हेरिफिकेशन कमिटीच्या तपासणीत उघड : सेतू कार्यालयात बोगस दस्तावेज बनविणारे रॅकेट सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जातीच्या ४ प्रमाणपत्रांवर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या ४ वेगवेगळ्या सह्या आढळून आल्या आहेत. आरटीई व्हेरिफिकेशन कमिटीच्या तपासणीत हा बोगसपणा उघडकीस आला आहे. सेतू कार्यालयातून हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे सेतू कार्यालयात बोगस प्रमाणपत्र मिळवून देणारे रॅकेट सक्रिय असल्याचे दिसते आहे.
शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी असे बोगस प्रमाणपत्र सेतू कार्यालयातून बनवून देण्यात येत आहे. शनिवारी व्हेरिफिकेशन कमिटीपुढे बोगस दस्तावेजाचे काही प्रकरण पुढे आले. व्हेरिफिकेशन समितीचे सदस्य व आरटीई अ‍ॅक्शन कमिटीचे अध्यक्ष मो. शाहिद शरीफ यांनी ११ बोगस दस्तावेजासंदर्भातील तक्रार उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

३ उत्पन्नाचे दाखले, ८ जाती प्रमाणपत्रे
शाहिद शरीफ म्हणाले की, जुलै महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज बंद होते. दरम्यान, ३ लोकांनी बोगस उत्पन्नाचे दाखले व ८ बोगस जातीचे प्रमाणपत्र बनविले होते. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती घेतली असता, ते दस्तावेज जिल्हाधिकारी कार्यालयातून दिलेच नसल्याचे सांगण्यात आले. दस्तावेजावर निवासी जिल्हाधिकाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात लिखित तक्रार करण्यास शरीफ यांना सांगितले.

Web Title: Bogus signature of resident deputy collector on caste certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.