शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

'बोगस' शालार्थ आयडीचे धागेदोरे पूर्व विदर्भाच्या कानाकोपऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 10:56 IST

चंद्रपूर, गोंदियामधूनही धक्कादायक माहिती आली समोर : अनेक जिल्ह्यांमध्ये पसरले शिक्षण उपसंचालक-शिक्षणाधिकाऱ्यांचे वसुली जाळे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भंडारा जिल्ह्यात बोगस मुख्याध्यापकाला शालार्थ आयडी देण्याप्रकरणात शिक्षण उपसंचालक उल्हास नरड व इतरांना अटक झाल्यानंतर अशा 'बोगसपणा'ची प्रकरणे अनेक जिल्ह्यातून समोर येत आहेत. चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांतील बोगस भरतीची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

शिक्षक संघटनेचे प्रमोद रेवतकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील लोकमान्य विद्यालयातील ११ कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य नियुक्तीची माहिती दिली. शाळा व्यवस्थापनाने बॅकलॉग नियमाच्या विरुद्ध जात संस्थेच्या दोन शाळांमध्ये पाच शिपाई व सहा लिपिक वर्गाच्या पदांची भरती केली. या भरतीला चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी पूनम मस्के यांनी मान्यता दिली होती. त्यानंतर आलेल्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी २०२२ मध्ये या भरतीमध्ये घोळ असल्याचा ठपका ठेवत कर्मचाऱ्यांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला व प्रकरण पुढच्या निर्णयासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठविले. तत्कालीन शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांच्या काळात कर्मचाऱ्यांचा शालार्थ मंजूर करण्यात आला होता, पण वेतन सुरू झाले नव्हते. पुढे जामदार यांच्या जागी उल्हास नरड यांची नियुक्ती झाली. या काळात शिक्षक आमदारांच्या बैठकीनंतर उपसंचालकांनी नव्या आलेल्या चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी निकिता ठाकरे यांच्या माध्यमातून ११ कर्मचाऱ्यांच्या पदांना मान्यता देत त्यांचे वेतन सुरू करण्यास मदत केल्याचा आरोप प्रमोद रेवतकर यांनी केला आहे. एक महिना वेतन उचलल्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले आणि त्यांचे वेतन थांबविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 

एसआयटी चौकशी करादुसऱ्या एका प्रकरणात चंद्रपूरच्या नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र पडवेकर यांची शालार्थ आयडी शिक्षण उपसंचालकांद्वारे अकारण रोखण्यात आल्याचेही रेवतकर यांनी सांगितले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रात त्रुट्या काढणे व पैशांचा व्यवहार झाल्यानंतर शालार्थ आयडी मंजूर करणे, वेतन सुरू करणे हा शिक्षण उपसंचालक कार्यालयाचा नित्यक्रम झाल्याचा आरोप प्रमोद रेवतकर यांनी केला. या रॅकेटमध्ये संबंधित जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधिकारीही गुंतले असल्याचा आरोप करीत या संपूर्ण प्रकरणात एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

१६ बोगस शिक्षकांची मान्यता रद्द करूनही वेतन सुरूच

  • गोंदिया जिल्ह्यात अनेक खासगी शिक्षण • संस्थांमधील १६ शिक्षकांची मान्यता रद्द झाल्यानंतरही सहा महिन्यांपासून त्यांचे वेतन बंद न करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर यांनी दिली.
  • बनावट कागदपत्रांच्या आधारे १६ लोकांनी शिक्षक पद मिळविले. याबाबत मानकर यांनी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या होत्या.
  • त्या आधारावर शिक्षण विभागाचे संचालक, पुणे 3 यांनी या सर्व १६ शिक्षकांची मान्यता रद्द करून त्यांचे वेतन रोखण्याचे आदेश दिले आहेत.
  • या आदेशाला सहा महिने लोटल्यानंतरही त्यांचे वेतन बंद न करता शिक्षकांना लाभ दिला जात आहे. या प्रकरणात संस्थाचालकांसह नागपूरचे शिक्षण उपसंचालक, गोंदियाचे शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि गोंदियाचे वेतन पथक अधीक्षक यांचेही संगनमत असल्याचा आरोप मानकर यांनी केला आहे.
  • शासनाला भुर्दंड बसविणाऱ्या या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी मानकर यांनी शिक्षण संचालक, पुणे, विभागाचे प्रधान सचिव व इतर उच्च अधिकाऱ्यांना शपथपत्राद्वारे केली आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूर