शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बोगस ‘रॉ’ अधिकाऱ्याने पत्नीलाही फसविले : लग्न करून एक कोटी हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 00:02 IST

‘रॉ’ ऑफिसर बनून चित्रपट निर्माते विपुल शाह यांच्या पार्टनरला पाच कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या झारखंड येथील चर्चित राजेश सिंह याने आपल्या पत्नीलाही फसविले. एक कोटी रुपये हडपण्यासाठी त्याने लग्न केले होते.

ठळक मुद्दे बजाजनगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘रॉ’ ऑफिसर बनून चित्रपट निर्माते विपुल शाह यांच्या पार्टनरला पाच कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या झारखंड येथील चर्चित राजेश सिंह याने आपल्या पत्नीलाही फसविले. एक कोटी रुपये हडपण्यासाठी त्याने लग्न केले होते. फसवणुकीची ही घटना बजाजनगर पोलीस ठाणे अंतर्गत घडली. राजेश कुमार तारकेश्वर सिंह (४२) रा. रांची, झारखंड असे आरोपीचे नाव आहे.  राजेश एक रिसोर्टवर काम करीत होता. यादरम्यान त्याची पीडित रेणुकासोबत ओळख झाली. रेणुकाच्या आईकडे एक घर होते. त्याची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक होती. याची कल्पना राजेशला असल्याने त्याने रेणुकाला आपल्या जाळ्यात अडकविले. पोलीस सूत्रानुसार, २०१४ मध्ये राजेशने रेणुकाला तिच्या पहिल्या पतीशी घटस्फोट घेऊन त्याच्याशी मंदिरात लग्न करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिचे घर हडपण्याची तयारी केली. रेणुकाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर बोगस स्वाक्षरीद्वारे स्वत:ला घरात भाडेकरू असल्याचे सांगितले. बोगस मृत्युपत्र बनवून रेणुकाच्या भावालाही वडिलांच्या संपत्तीतून बेदखल केले. त्याची ही योजना यशस्वी ठरली नाही आणि काही दिवसानंतर रेणुकाने घर विकले. त्यानंतर राजेशने रेणुकाला घर विक्रीतून मिळालेले एक कोटी रुपये हडपण्याची तयारी सुरू केली. काही दिवसानंतर रेणुकाची प्रकृती अतिशय खालावली. याचा गैरफायदा घेऊन राजेशने एक कोटी रुपये हडपले आणि रांचीमध्ये एका दुसºया महिलेशी लग्नही केले. रेणुकाला आपल्या जाळ्यात अडकवीत असतानाच राजेश सिंह इरिडियम घोटाळ्याशी जुळला. त्याने निर्माते विपुल शाह यांचे भागीदार विनीत सिंघी यांना चित्रपटात फायनान्स उपलब्ध करून देण्याच्या नावावर नागपुरात बोलावले. राजेशने त्यांना तो गुप्तचर संस्था रॉ चा इंटरपोल आॅफिसर असल्याचे सांगितले. इरिडियमच्या खरेदी-विक्रीमध्ये मोठी कमाई असल्याचे आमिष दिले. याप्रकारे विनीत यांच्यासह अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून ५ कोटी रुपयांची फसवणूक केली. हे प्रकरण उघडकीस येताच आर्थिक शाखेने गुन्हा दाखल करून राजेश सिंहला अटक केली. यादरम्यान रेणुकालाही त्याचे खरे रूप लक्षात आले. तिने बजाजनगरात तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी प्रकरण बंद करण्याची शिफारस केली. पोलिसांच्या या हलगर्जीमुळे २०१९ मध्ये राजेशला इरिडियम घोटाळा प्रकरणातही जामीन मिळाला. बजाजनगर पोलिसांच्या या भूमिकेमुळे दुखावलेल्या रेणुकाने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे तक्रार केली. पोलीस आयुक्तांनी रेणुकाच्या तक्रारीला गांभीर्याने घेत गुन्हे शाखेकडे याचा तपास दिला. या आधारावर राजेश सिंह विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.बजाजनगर पोलिसांच्या या भूमिकेमुळे दुखावलेल्या रेणुकाने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे तक्रार केली. पोलीस आयुक्तांनी रेणुकाच्या तक्रारीला गांभीर्याने घेत गुन्हे शाखेकडे याचा तपास दिला. या आधारावर राजेश सिंह विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी