शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

नागपुरात 2,563 कोटींचे बोगस ‘जीएसटी बिल’ रॅकेट उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 01:52 IST

‘डीजीजीआय’ची कारवाई : नाशिक, धुळे, दिल्ली, फरिदाबादमध्ये धाडी

ठळक मुद्देबनावट ‘इनव्हॉईस’च्या आधारे शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरोधात केंद्रीय जीएसटी विभागाने कठोर पावले उचलली असून शोध मोहीम सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट ‘इनव्हॉईस’च्या आधारे चालणाऱ्या आणखी एका ‘जीएसटी बिल’ रॅकेटचा केंद्रीय जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर झोनल युनिटने भंडाफोड केला आहे. नाशिक, धुळे, दिल्ली व फरिदाबादमध्ये धाडी टाकण्यात आल्या व २ हजार ५६३ कोटींचे बनावट व्यवहार उघडकीस आले. अस्तित्वातच नसलेल्या ११ प्रतिष्ठानांच्या नावाने हा प्रकार सुरू होता. यादरम्यान अवैध पद्धतीने ४६१ कोटी ३४ लाख रुपयांचे ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’देखील घेण्यात आल्याचा खुलासा झाला आहे.

बनावट ‘इनव्हॉईस’च्या आधारे शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरोधात केंद्रीय जीएसटी विभागाने कठोर पावले उचलली असून शोध मोहीम सुरू केली आहे. नाशिक व धुळे येथील प्रतिष्ठान अस्तित्वातच नसल्याची बाब समोर आल्यानंतर ‘डीजीजीआय’च्या चमूने एनसीआर, नवी दिल्ली, फरिदाबाद येथे धाडी टाकल्या. ‘एनसीआर’मध्ये ११ प्रतिष्ठानांनी नाशिक व धुळे येथील प्रतिष्ठानांना बोगस पद्धतीने उत्पादनांचा पुुरवठा केल्याचे दर्शविण्यात आले होते. संबंधित प्रतिष्ठान दिलेल्या पत्त्यावर नसल्याचादेखील खुलासा झाला. ११ पैकी ६ प्रतिष्ठानांनी नाशिक आणि धुळे येथील कंपन्यांसोबत बोगस पद्धतीने व्यवहार दर्शविला होता. तर ४ प्रतिष्ठानांनी समान पॅन कार्डचा आधार घेतला होता. १० प्रतिष्ठानांनी बोगसपणे ३१५ कोटी ६५ लाख रुपयांचा ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ मिळवत नाशिक व धुळ्यातील कंपन्यांसोबत त्याची वाटणी केली. तर एका अन्य बोगस बिल नेटवर्कमध्ये ‘एनसीआर’मधील एका प्रतिष्ठानाने खोट्या पद्धतीने १४५ कोटी ६९ कोटींचे ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ घेतले. 

‘मास्टरमाईंड’चा शोध सुरूया ११ प्रतिष्ठानांनी २ हजार ५६३ कोटी रुपयांची बोगस बिले जारी करुन ४६१ कोटी ३४ लाख रुपयांचा ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ मिळविला. या प्रकरणातील ‘मास्टरमाईंड’चा ‘डीजीजीआय’चा चमू शोध घेत आहे.

टॅग्स :GSTजीएसटीCrime Newsगुन्हेगारी