शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस कागदपत्रांची चौकशी, उच्च न्यायालयाचा आदेश, सहा आठवड्यांत ‘बाजोरिया कन्स्ट्रक्शन’चा मागितला अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 03:56 IST

 नागपूर : विविध सिंचन प्रकल्पांचे कंत्राट मिळविणा-या बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कागदपत्रांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला दिले. बाजोरिया कन्स्ट्रक्शनने बोगस कागदपत्रांच्या आधारे सिंचन प्रकल्पांचे कंत्राट मिळविल्याचा आरोप आहे.याप्रकरणी कंत्राटदार अतुल जगताप यांनी जनहित याचिका दाखल केली ...

 नागपूर : विविध सिंचन प्रकल्पांचे कंत्राट मिळविणा-या बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कागदपत्रांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला दिले. बाजोरिया कन्स्ट्रक्शनने बोगस कागदपत्रांच्या आधारे सिंचन प्रकल्पांचे कंत्राट मिळविल्याचा आरोप आहे.याप्रकरणी कंत्राटदार अतुल जगताप यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. न्या़ भूषण धर्माधिकारी व न्या़ अरुण उपाध्ये यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. बाजोरिया कन्स्ट्रक्शनने कंत्राटे मिळण्यासाठी अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र सादर केले. माहितीच्या अधिकारांतर्गत कंपनीचे खरे अनुभव प्रमाणपत्र प्राप्त करण्यात आले असून, कंत्राटांसाठी वापरण्यात आलेल्या अनुभव प्रमाणपत्रापेक्षा ते वेगळे आहे. कंपनीने अलीकडेच नवीन कंत्राट मिळण्यासाठी खरे अनुभव प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे कंपनीच्या कागदपत्रांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी विनंती याचिकाकर्त्याने न्यायालयाला केली होती. माजी आमदार संदीप बाजोरिया कंपनीचे संचालक आहेत. त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मिळून सिंचन प्रकल्पांमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार केला, असा याचिकाकर्त्याचा आरोप आहे.चारही वादग्रस्त प्रकल्पांची चौकशी सुरूबाजोरिया कन्स्ट्रक्शनला वाटप झालेल्या अमरावती जिल्ह्यातील निम्नपेढी, वाघाडी व रायगड नदी सिंचन प्रकल्प तसेच बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव सिंचन प्रकल्पाच्या कंत्राटावर याचिकाकर्त्याचा आक्षेप आहे. शासनाने न्यायालयाच्या गेल्या आदेशानुसार प्रतिज्ञापत्र सादर करून, चारही प्रकल्पांची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली.त्यानुसार, अमरावती येथील अधीक्षक अभियंता (दक्षता) यांनी जिगाव प्रकल्पाचे विशेष लेखापरीक्षण करून शासनाला अहवाल सादर केला आहे. त्यावर चार आठवड्यांत निर्णय घेतला जाणार आहे. निम्नपेढी प्रकल्पाचे लेखापरीक्षण सुरू असून, त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. उर्वरित दोन प्रकल्पांचे लेखापरीक्षण करण्याचे निर्देश अधीक्षक अभियंता (दक्षता) यांना देण्यात आले आहेत.अजित पवार यांना दिलासा नाहीचया प्रकरणातील प्रतिवादींमधून वगळण्यासाठी अजित पवार यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पवार यांच्यावर कोणतेही थेट आरोप नसल्याचा दावा अर्जात करण्यात आला आहे. आतापर्यंत अ‍ॅड. श्याम देवानी पवार यांची बाजू मांडत होते. बुधवारी, वरिष्ठ अधिवक्ता एम. जी. भांगडे यांनी बाजू मांडून अर्ज मंजूर करण्याची विनंती केली. परंतु, न्यायालयाने तूर्तास कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.

टॅग्स :Courtन्यायालयCorruptionभ्रष्टाचारMumbai High Courtमुंबई हायकोर्ट