शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

नागपुरात घरफोडी करणारे बॉडी बिल्डर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 8:06 PM

घरफोडी करून आपले महागडे खर्च भागविणारी बॉडी बिल्डरची एक जोडी अजनी पोलिसांनी शोधून काढली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या ४८ तासात या जोडीचा छडा लावून दोघांनाही पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देफूड सप्लीमेंट सप्लायरही गजाआड : धाडसी घरफोडीतून खुलासा : अजनी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरफोडी करून आपले महागडे खर्च भागविणारी बॉडी बिल्डरची एक जोडी अजनी पोलिसांनी शोधून काढली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या ४८ तासात या जोडीचा छडा लावून दोघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे साहित्य तसेच अन्य चीजवस्तूंसह सहा लाखांचे सामान पोलिसांनी जप्त केल्याची माहिती परिमंडळ तीनचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी आज पत्रकारांना दिली. अफसर मोहम्मद खान (वय ३१, रा. तीन खंबा चौक, टिमकी) आणि इरफान हामिद खान (वय २८, रा. ज्योतीनगर खदान) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्ञानेश्वरनगरात कालीचरण टाकभवरे यांचे निवासस्थान आहे. त्यांचा संयुक्त परिवार वरच्या आणि खालच्या माळ्यावर राहतो. १२ नोव्हेंबरला ते सहपरिवार दिवाळीच्या सुटीत कुलूमनाली येथे फिरायला गेले होते. १३ नोव्हेंबरला सकाळी त्यांच्या घराच्या तीनही दारांचे कुलूप तुटलेले शेजाऱ्यांना दिसले. त्यामुळे शेजाºयांनी ही माहिती टाकभवरे यांचे जावई सतीश चव्हाण (रा. राजनगर) यांना कळविली. ते टाकभवरेंच्या घरी पोहचले. चौकशीत घरातील १५ तोळे सोने, दिवाळी पूजनासाठी काढून ठेवलेले ६० हजार रुपये आणि एलसीडी घरातून चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.या धाडसी चोरीची माहिती कळताच अजनीचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीत टाकभवरेंच्या घराशेजारी १३ नोव्हेंबरच्या पहाटे बॉडी बिल्डर तरुण संशयास्पद अवस्थेत दिसल्याची माहिती पुढे आली. आजूबाजूच्या सीसीटीव्हीत दुचाकीवर एलसीडी टीव्ही नेताना आरोपी दिसून आले. त्यांच्या दुचाकीचे क्रमांक मिळाल्यानंतर अजनीचे ठाणेदार शैलेश संख्ये यांनी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांना ही माहिती दिली. त्यांनी लगेच आरोपींची नावे व पत्ते मिळवून त्यांना अटक करण्यासाठी पथक रवाना केले.गुरुवारी रात्रीनंतर आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथक आरोपींच्या घरी गेले तेव्हा त्यांना आरोपीच्या नातेवाईकांनी जोरदार विरोध केला. त्याला न जुमानता पोलिसांनी आरोपी अफसर आणि इरफानला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी घरफोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून ६० हजार रुपये, सोन्याचे दागिने, एलसीडी टीव्ही आणि चोरीत वापरलेली बुलेट तसेच अन्य एक दुचाकी जप्त केली.आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येऊ शकतात, अशी शक्यताही उपायुक्त भरणे यांनी व्यक्त केली. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या ४८ तासात आरोपींच्या मुसक्या बांधून त्यांच्याकडून सुमारे ६ लाखांचे साहित्य जप्त करण्याची कामगिरी अजनीचे पोलीस उपानिरीक्षक वाय. व्ही. इंगळे, के. पी. मगर, हवलदार अनिल ब्राम्हणकर, रामचंद्र कारेमोरे, सिद्धार्थ पाटील, नायक शैलेष बडोदेकर, आशिष राऊत, मनोज टेकाम, राहुल वरखडे, देवेंद्र वनघरे, अलका ठेंगरे यांनी ही कामगिरी बजावल्याचेही उपायुक्त भरणे यांनी पत्रकारांना सांगितले.

मॉडेल फिजिक स्पर्धेची तयारी अन्...आरोपी इरफान आणि अफसर हे दोघेही चांगले बॉडी बिल्डर आहेत. त्यांनी अनेक शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभागही नोंदवला आहे. राम कुलर चौकात इरफानच्या भावाचा जीम आहे. तेथे हे दोघे ट्रेनर म्हणून काम करतात. तेथे येणारांना अफसर प्रोटीन्स (फूड सप्लिमेंट)ही पुरवितो. जानेवारी २०१९ मध्ये मुंबईत होऊ घातलेल्या मॉडेल फिजिक स्पर्धेची इरफानने तयारी चालवली होती. मात्र, पाहिजे तशी मिळकत नसल्याने आपण ही घरफोडी केल्याचे या दोघांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अफसरची मैत्रिण ओमकारनगरात राहते. त्यामुळे तो तिला भेटायला नेहमीच इकडे येतो. घटनेच्या मध्यरात्री १२ वाजता तो मैत्रिणीला भेटायला जात असताना त्याला टाकभवरेच्या घरी कुलूप लागलेले दिसले. त्याने ही माहिती इरफानला फोन करून दिली. त्यानंतर दोघांनी पहाटेच्या वेळी टाकभवरेच्या निवासस्थानाचे कुलूप तोडून ही धाडसी घरफोडी केली. मात्र, परिसरातील सीसीटीव्हीने त्या दोघांना कैद करून पोलिसांच्या कोठडीत पोहचवले. ही आपली पहिलीच घरफोडी असल्याचे आरोपी सांगत आहेत. मात्र, त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरून त्यांनी यापूर्वीही असे अनेक गुन्हे केले असावे, असा संशय असल्याचे उपायुक्त भरणे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी