शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बॉबी माकन हत्याकांड प्रकरण : लिटील गँगची तुरुंगात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 21:58 IST

ट्रान्सपोर्टर भूपेंद्रसिंग ऊर्फ बॉबी माकन यांच्या हत्येत सहभागी असलेली लिटील गँग सोमवारी तुरुंगात पोहोचली. न्यायालयाने पोलीस कोठडीची परवानगी नाकारत लिटीलसह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी अंतर्गत तुरुंगात पाठवले. आता फरार आरोपी मंजीत वाडे पोलिसांच्या हाती लागेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देहत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रान्सपोर्टर भूपेंद्रसिंग ऊर्फ बॉबी माकन यांच्या हत्येत सहभागी असलेली लिटील गँग सोमवारी तुरुंगात पोहोचली. न्यायालयाने पोलीस कोठडीची परवानगी नाकारत लिटीलसह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी अंतर्गत तुरुंगात पाठवले. आता फरार आरोपी मंजीत वाडे पोलिसांच्या हाती लागेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.बॉबी माकनचे २५ एप्रिल रोजी रात्री जरीपटका येथून अपहरण करण्यात आले होते. दीक्षितनगर येथील घराजवळ त्याची कार बेवारस सापडल्याने तो बेपत्ता असल्याचे लक्षात आले होेते. त्याच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजवरून बॉबीचे अपहरण झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर २८ एप्रिल रोजी कोंढाळी येथे त्याचा मृतदेह सापडल्याने त्याची हत्या केल्याचे आढळून आले. बॉबी बेपत्ता झाल्यापासून लिटील सरदार आणि मंजित वाडे याच्यावर संशय घेतला जात होता. अपहरणासाठी वापरण्यात आलेली इनोव्हा गाडी सापडल्याने लिटीलच्या टोळीतील हनी चंडोक याला अटक केल्यावर या हत्येचा पर्दाफाश झाला.गुन्हे शाखा पोलिसांनी ४ मे रोजी लिटील, त्याचा बॉडीगार्ड सीटू गौर आणि मित्र बाबू खोकर याला अटक केली. नंतर इनोव्हाचा माक बिट्टू भाटिया यालाही अटक करण्यात आली. अटक झाल्यापासूनच लिटील या हत्याकांडामागचे खरे कारण लपवित आहे. त्याच्यावर गोळीबार केल्याच्या संशयात बॉबीचा खून करण्यात आल्याचे त्याचे म्हणणे आहे. मंजित वाडे यानेच गळा आवळून त्याचा खून केल्याचे तो सांगत आहे. परंतु कमाल चौकातील कोट्यवधी किमतीच्या जमिनीचा वाद हे हत्येचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. पोलिसांना मंजित वाडेचा अजूनही पत्ता लागलेला नाही.लिटील तुरुंगात जाईपर्यंत मंजित पोलिसांच्या हाती लागणार नाही, अशी शक्यता लोकमतने वर्तविली होती. त्यामुळे पोलीस मंजितचा पत्ता लावू शकली नाही. आता कुठल्याही क्षणी मंजित वाडेला अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तोसुद्धा हत्येचे मुख्य कारण सांगण्याऐवजी पोलिसांची दिशाभूल करेल, याचीच अधिक शक्यता आहे. मंजित हासुद्धा सराईत गुन्हेगार आहे. त्याने भिसीच्या धंद्यात मोठी संपत्ती जमविली आहे. तो सट्टा आणि जुगार अड्डाही चालवतो. सूत्रानुसार लिटील गँगने सुरक्षित सुटण्याच्या अटीवरच बॉबीची हत्या केल्याचे सांगितले जाते.प्रतिबंधात्मक कारवाई होणारशहर पोलीस लिटील गँगच्या विरुद्ध कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. लिटील गँगच्या विरुद्ध गोळीबार प्रकरणानंतर मकोकाची कारवाई करण्यात आली होती. यात लिटील गँगसोबत बिट्टू भाटियाही सहभागी होता. त्यानंतर मात्र लिटील गँगविरुद्ध कुठलीही प्रतिबंधात्मक कारवाई झालेली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनjailतुरुंग