पुरवणी परीक्षेचे निकाल जाहीर : दहावीत ३१.८४ तर बारावीत २९.८७ टक्के विद्यार्थी उत्तीर्णनागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुरवणी परीक्षेचे निकाल बुधवारी जाहीर करण्यात आले. नागपूर विभागात बारावीचा निकाल २९.८७ टक्के आणि दहावीचा निकाल ३१.८४ टक्के लागला आहे. दहावी आणि बारावीच्या निकालात मागील वर्षीच्या तुलनेत वाढ दिसून आली. बारावीच्या निकालात नागपूर विभागीय मंडळाचा राज्यात तिसरा तर दहावीच्या निकालात दुसरा क्रमांक आहे.दहावी आणि बारावी दोन्ही वर्गांच्या विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून ४ डिसेंबर रोजी प्राप्त होणार आहेत. गुणपडताळणीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर आहे, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. दहावीचा निकाल ३१.८४ टक्केनागपूर विभागातून दहावीच्या हिवाळी परीक्षेला १९ हजार १२३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ६ हजार ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णांमध्ये २९.५३ टक्के विद्यार्थी तर ३४.९२ टक्के विद्यार्थिनी आहेत.बारावीचा निकाल २९.८७ टक्केबारावीेला यंदा १२ हजार ११९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३ हजार ५११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागाची टक्केवारी २९.८७ टक्के आहे. उत्तीर्णांमध्ये २४.९१ टक्के विद्यार्थी तर ३४.९२ टक्के विद्यार्थिनी आहेत.एकच विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत दहावीच्या निकालात विभागातील केवळ एक विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. पहिल्या श्रेणीत तीन तर दुसऱ्या श्रेणीत नऊ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीत १० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर ६३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
बोर्डाच्या निकालात सुधारणा
By admin | Updated: November 26, 2014 01:03 IST