शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ टी-२० क्रिकेट स्पर्धेत बोर्ड एकादशचा एका धावेने विजय

By जितेंद्र ढवळे | Updated: December 26, 2023 21:45 IST

चौधरी चरणसिंह हरयाणा कृषी विद्यापीठ संघाला केलं पराभूत

जितेंद्र ढवळे, नागपूर: शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानाखाली विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ टी-२० 'कुलगुरू चषक' क्रिकेट स्पर्धेस मंगळवार (दि. २६) पासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी खेळल्या गेलेल्या रोमहर्षक सराव सामन्यामध्ये बोर्ड एकादश संघाने चौधरी चरणसिंह हरयाणा कृषी विद्यापीठ संघाला एका धावेने पराभूत करीत विजय प्राप्त केला.

सक्करदरा येथील श्री बिंझाणीनगर महाविद्यालयाच्या क्रिकेट मैदानावर झालेल्या सराव सामन्यामध्ये बोर्ड एकादश संघाने २० शतकांत ९ बाद २१५ धावा काढल्या. या धावांचा पाठलाग करताना हरयाणा कृषी विद्यापीठाच्या संघाने ५ बाद २१४ धावांपर्यंत मजल मारली. मात्र त्यांना एका धावेने पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना बोर्ड एकादश संघातील नरेंदर शिलक याने ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने २१ चेंडू ५७ धावा काढल्या; तर तरुणनेदेखील साथ देत ३३ चेंडूंत ५७ धावा काढल्या.

हरयाणा कृषी विद्यापीठाच्या डॉ. विनय अहलावत याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. या धावांचा पाठलाग करताना हरयाणा कृषी विद्यापीठ हिसारच्या संघाने उत्कृष्ट फलंदाजी केली. दीपक कुमार यांनी ३१ चेंडूंत ४ चौकार २ षटकारांसह एकूण ५७ धावा काढल्या. अखेरच्या चेंडूपर्यंत सामन्यातील सस्पेन्स कायम होता. अखेर एका धावेने बोर्ड एकादश संघाने हा सामना जिंकला. हिस्सार विद्यापीठाचे डॉ. विनय अहलावत यांना ‘प्लेयर ऑफ द मॅच’ हा पुरस्कार देण्यात आला.

टॅग्स :nagpurनागपूर