शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डाच्या परीक्षेमुळे निवडणुकीच्या कामातून मिळणार मुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:00 IST

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेच्या कामात व्यस्त असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कामातून मुक्त केले आहे. यासंदर्भात अप्पर मुख्य सचिव वंदना कृ ष्णा यांनी सर्व जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे. या पत्रात परीक्षेचे काम करणाऱ्या शिक्षकांचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे शिक्षकांना दोन्ही कामे करावी लागणार आहे.

ठळक मुद्देसर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सूट, शिक्षकांना नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेच्या कामात व्यस्त असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कामातून मुक्त केले आहे. यासंदर्भात अप्पर मुख्य सचिव वंदना कृ ष्णा यांनी सर्व जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे. या पत्रात परीक्षेचे काम करणाऱ्या शिक्षकांचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे शिक्षकांना दोन्ही कामे करावी लागणार आहे.वंदना कृष्णा यांनी पाठविलेल्या पत्रामध्ये बोर्डाच्या दहावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. १ मार्चपासून सुरू होणाऱ्या लेखी परीक्षा २२ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. बारावीच्या पॅ्रक्टिकल परीक्षा १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. २१ फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा सुरू होणार असून, २० मार्चपर्यंत चालणार आहे. परीक्षेचे कार्य संवेदनशील आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार परीक्षेनंतर बोर्डाला १० जूनपर्यंत निकाल घोषित करायचा आहे. त्यामुळे परीक्षेचे काम महत्त्वाचे आहे. सध्या बोर्डाकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. हे लक्षात घेता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्य शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामातून मुक्तता केली आहे.काही दिवसांपूर्वी नागपूर विभागीय कार्यालयाला निवडणुकीच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठविले होते. निवडणुकीच्या कामासाठी बोर्डातून कर्मचाऱ्यांना पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. परीक्षेचा कालावधी लक्षात घेता बोर्डाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी मंडळाच्या मुख्यालयाला पत्र पाठविले होते. बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची विनंती केली होती. बोर्डाच्या पत्रानंतर शिक्षण विभागाने राज्य सरकारकडे यासंदर्भात विनंती केली. शिक्षकांना करावेच लागेल दोन्ही कामकृष्णा यांन पत्रात केवळ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाच अधोरेखित केले आहे. यात शिक्षकांचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे शिक्षकांना कुठलीही सवलत मिळणार नाही. त्यांना परीक्षेसोबतच निवडणुकीचे कार्य करावे लागणार आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकElectionनिवडणूक