शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

‘टेंडर निघालं निळ्या झेंड्याच्या विक्रीचं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:57 IST

कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एका जातीपुरते मर्यादित करून ठेवले. निवडणूक जवळ आली की राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा रिपाइंच्या गटातटांची साथ घेऊन आपली राजकीय पोळी कशी शेकून घेतात, याचे वास्तव संगीत राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांनी आंबेडकरांना स्वार्थासाठी राजकीय भांडवल बनविणाऱ्या पक्षांवर आपल्या गीताद्वारे जोरदार प्रहार केला.

ठळक मुद्दे‘मी वादळवारा’ : अनिरुद्ध वनकरांच्या प्रबोधनपर गीतांनी रसिकांमध्ये जोश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एका जातीपुरते मर्यादित करून ठेवले. निवडणूक जवळ आली की राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा रिपाइंच्या गटातटांची साथ घेऊन आपली राजकीय पोळी कशी शेकून घेतात, याचे वास्तव संगीत राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांनी आंबेडकरांना स्वार्थासाठी राजकीय भांडवल बनविणाऱ्या पक्षांवर आपल्या गीताद्वारे जोरदार प्रहार केला.प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने त्यागमूर्ती रमाई महोत्सवाच्यावतीने भगवाननगर येथील पोस्ट आॅफिस मैदानावर ‘मी वादळवारा’ या राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांच्या प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांनी आंबेडकरी जनतेसमोर एकापेक्षा एक प्रबोधनपर गीते सादर करून त्यांचे वैचारिक प्रबोधन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी ‘जगात जोवर असेल पृथ्वी... सूर्य, चंद्र, अंबर...चमचमणारा एकच तारा भीमराव आंबेडकर’ हे गीत सादर करताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून त्यांना दाद दिली. त्यानंतर ‘भीम कुठं पाहु, भीम कुठं पाहु’ हे गीत त्यांनी सादर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यागमूर्ती रमाईने साथ दिल्यामुळेच बाबासाहेब समाजासाठी आपले योगदान देऊ शकले. रमाईची महती सांगताना वनकर यांनी ‘कुणाचेच काही इथे कष्ट नाही, तुझीच कमाई आहे गं भीमाई’ हे गीत सादर केले. समाजात सुधारणा घडविण्यासाठी अनेक संतांनी ओव्या, गीतांद्वारे प्रबोधन केले. त्यातील संत कबीर यांचे ‘जत्रा मे फरता बिठाया, तीरथ बनाया पाणी...कबिरा’ हे गीत सादर केले. प्रबोधनाच्या या मैफिलीत त्यांनी ‘भीमा बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर’ अशी एकापेक्षा एक सरस गीते सादर करून उपस्थित रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला. कार्यक्रमात सहगायक देवदत्त सातपुते यांनी ‘शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता.’, सहगायक सुरेश खोब्रागडे यांनी माता रमाई झिजली स्वत:’ ही गीते सादर केली. प्रबोधनपर गीतांच्या या प्रवासात गायकांना ढोलकीवर ईश्वर खोब्रागडे, तबल्यावर आनंद वाकडे, हार्मोनियमवर अनिल डोंगरे, की बोर्डवर लोकेश दुर्गे, आॅक्टोपॅडवर विपीन राऊत यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन मंगेश मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर