शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात रेतीघाट सुपरवायझरचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:45 IST

सिल्लेवाडा (ता. सावनेर) शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पात्रात जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली. तो मृतदेह रेतीघाट सुपरवायझरचा असून, त्याचा खून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले.

ठळक मुद्देसिल्लेवाडा शिवारातील घटनाकन्हान नदीत जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिल्लेवाडा (ता. सावनेर) शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पात्रात जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली. तो मृतदेह रेतीघाट सुपरवायझरचा असून, त्याचा खून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले.नंदकुमार ऊर्फ छोटू रामगुलाम वर्मा (२६, रा. जुना हवामहल, सिल्लेवाडा, ता. सावनेर) असे मृताचे नाव आहे. तो वेकोलिच्या अखत्यारित असलेल्या कन्हान नदीवरील सिल्लेवाडा रेतीघाटात सुपरवायझर म्हणून काम करायचा. शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह कन्हान नदीत पाण्यावर तरंगताना आढळून आला. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असून, शरीरावर कपडे नव्हते.या घाटाचा कंत्राट नागपूर येथील खंडेलवाल यांना देण्यात आला आहे. नंदकुमार याचे घर नदीपासून जवळ आहे. तो गुरुवारी कामावर गेला होता. रात्री जेवण केल्यानंतर तो घरी परतला नव्हता. अमरजित यादव याने शुक्रवारी सकाळी नंदकुमारच्या मोटरसायकलची चावी त्याच्या घरी आणून दिली होती. त्याची एमएच-४०/जी-४८९३ क्रमांकाची मोटरसायकल जवळच असलेल्या नर्सरीत आढळून आली. दुचाकीच्या फूटरेस्टला त्याची चांदीची चेन लटकलेली होती, शिवाय तिथे रक्ताचे डाग आढळून आले. तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत नोंदविली होती.दुचाकी आणि चावी सापडण्याचे ठिकाण यातील अंतर अर्धा कि.मी. आहे. नंदकुमारला आधी मारहाण करण्यात आली असावी, नंतर पेट्रोल टाकून जाळले असावे. त्यानंतर मृतदेह नदीत फेकला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याच्या खिशातील युको बँक व बँक आॅफ इंडियाचे एटीएम कार्ड सापडले नाही. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.गुन्हेगारांचा वावरया परिसरात गुन्हेगारांचा वावर आहे. सिल्लेवाडा घाटातील रेती मोठ्या प्रमाणात चोरून नेली जात असून, पोेकलॅण्ड मशीनने रेतीचा उपसा केला जातो. या घाटातील रेतीचा वापर खाण भरण्यासाठी केला जातो. येथील ट्रकच्या टँकमधून डिझेल काढून ते चोरून विकल्या जाते. या भागात गांजा ओढणाऱ्यांचा व जुगार खेळणाऱ्यांचाही वावर आहे. पोलीस त्याही दिशेने तपास करीत आहेत.

टॅग्स :Murderखूनsandवाळू