शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिकार केल्यामुळेच खून

By admin | Updated: September 18, 2015 03:00 IST

बलात्काराचा विरोध करीत आरडओरड केल्याने आरोपी स्कूल बस चालकाने विद्यार्थिनीचा गळा आवळून खून केल्याची बाब आरोपी जीवन छपाने याने कबूल केली.

प्रेमी असल्याचे सांगून केली दिशाभूल : आरोपीला २१ पर्यंत पोलीस कोठडी नागपूर : बलात्काराचा विरोध करीत आरडओरड केल्याने आरोपी स्कूल बस चालकाने विद्यार्थिनीचा गळा आवळून खून केल्याची बाब आरोपी जीवन छपाने याने कबूल केली. सुरुवातीला त्याने विद्यार्थिनीशी प्रेम संबंध असल्याची खोटी कहाणी सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु अखेर खरा प्रकार समोर आला. बुधवारी रात्री इसासनी येथे २० वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला. तपासादरम्यान मृतदेहाची ओळख पटली. कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर जीवनला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. मृत विद्यार्थिनीचे वडील मजुरी करतात. त्यांना तीन मुली आहेत. मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. मृत विद्यार्थिनी दुसऱ्या नंबरची होती तर तिसऱ्या क्रमांकाची मुलगी सातव्या वर्गात शिकते. आरोपी जीवन हा मृताच्या लहान बहिणीच्या स्कूल बसचा ड्रायव्हर आहे. लहान बहिणीला घेण्यासाठी तो तिच्या घरी यायचा. मृत विद्यार्थिनी आणि तिची मोठी बहीण या लहानपणापासूनच मामाच्या घरी राहत होत्या. आईवडिलांकडे त्या कधी-कधी यायच्या. याच दरम्यान जीवनची विद्यार्थिनीवर नजर पडली. जीवन हा दारुडा आहे. त्याचे तिसरे लग्न झाले होते. पत्नी सुद्धा रक्षाबंधनापासून परतली नाही. काही दिवसांपूर्वीच मृत विद्यार्थिनी आईवडिलांकडे राहायला आली होती. ती गुरुवारी घरी गणपतीची स्थापना करणार होती. १५ सप्टेंबरला ‘मंगळागौरी’ची पूजा होती. त्यासाठी विद्यार्थिनी बेल व फूल आणण्यासाठी गोपालनगर येथील मामाच्या घरी गेली होती. सायंकाळी ती आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. मावशीने तिला जाण्यासाठी पैसे दिले. बसमध्ये बसून ती रात्री ८.३० वाजता जयताळा बस स्टॉपवर पोहोचली. जीवन तिथे अगोदरपासूनच वाट पाहत उभा होता. तो तिला मिहान परिसरात घेऊन गेला. बसमधून उतरताच जीवन तिच्याशी बळजबरी करू लागला. विद्यार्थिनी आरडाओरड करीत स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करू लागली. तिचे ओरडणे बंद करण्यासाठी जीवनने तिचा गळा दाबून खून केला. विद्यार्थिनीच्या खुनात जीवनसोबतच त्याच्या मित्राचाही हात असल्याची शंका आहे. विद्यार्थिनी ही कडक स्वभावाची होती. तिच्या मित्रांची संख्या सुद्धा खूप कमी आहे. त्यामुळे ती स्वत:च्या मर्जीने जीवनसोबत गेली असावी, ही गोष्ट तिच्या कुटुंबीयांना मान्य नाही. त्यांना शंका आहे की, जीवनने आपल्या साथीदारांची मदत नक्कीच घेतली असावी. सोनेगाव पोलिसांनी गुरुवारी जीवनला न्यायालयात सादर करून २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत घेतले आहे. (प्रतिनिधी)मदतीचे आमिष दाखविले मृत विद्यार्थिनी ही गुरुवारी गणपतीची स्थापना करणार होती. परंतु तिच्याकडे पैशाची अडचण होती. तिने जयताळा बसस्टॉपवर जीवनला ही गोष्ट सांगितली. जीवनने तिला आर्थिक मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच पैसे घेण्यासाठी सोबत चलण्यास सांगितले. विद्यार्थिनी मदत मिळण्याच्या अपेक्षेने त्याच्यासोबत गेली. आईने केली होती तक्रार विद्यार्थिनीच्या आईने दोन महिन्यांपूर्वी दारूच्या नशेत स्कूल बस चालवल्याबाबत जीवनची तक्रार केली होती. दिवाळीनंतर दुसरा ड्रायव्हर ठेवण्याचे आश्वासन मिळाल्याने ती गप्प बसली. याचा बदला घेण्याच्या उद्देशाने जीवनने विद्यार्थिनीचा खून केला असावा, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे शाळेचा निष्काळजीपणा सुद्धा उघडकीस आला आहे.