शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अंध रमेश बासरीतून पेरतात जीवनाचे सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 21:53 IST

आंधळेपणाने जीवनात अंधार पसरला की व्यक्ती आत्मविश्वास गमावून बसतो. सगळेच संपले, आता फारसे काही करता येणार नाही, अशी नकारात्मकता त्याच्या मनात घर करू लागते. परंतु, अंध रमेश गुलानी याला अपवाद आहेत. ही नकारात्मकता आपल्यावर हावी न होऊ देता रमेश यांनी स्वत:ला संगीत साधनेतून स्वत:चे आयुष्य तर फुलवलेच, सोबतच हा ठेवा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याची त्यांची धडपड सुरू आहे.

ठळक मुद्देनिवृत्तीनंतरही संगीत साधना : नवीन पिढीला शिकविणार आॅनलाईन बासरी

दयानंद पाईकराव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंधळेपणाने जीवनात अंधार पसरला की व्यक्ती आत्मविश्वास गमावून बसतो. सगळेच संपले, आता फारसे काही करता येणार नाही, अशी नकारात्मकता त्याच्या मनात घर करू लागते. परंतु, अंध रमेश गुलानी याला अपवाद आहेत. ही नकारात्मकता आपल्यावर हावी न होऊ देता रमेश यांनी स्वत:ला संगीत साधनेतून स्वत:चे आयुष्य तर फुलवलेच, सोबतच हा ठेवा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याची त्यांची धडपड सुरू आहे.रमेश गुलानी हे मूळचे मूल जि. चंद्रपूर येथील रहिवासी. ते जन्मत:च दृष्टिहीन आहेत. परंतु आपल्याला काहीच दिसत नाही, या विचाराने ते कधीच खचून गेले नाहीत. वडिलांच्या प्रेरणेने त्यांनी नागपुरातील श्रद्धानंद अंध विद्यालयात शिक्षण घेतले. येथेच बासरी वाजविण्याच्या कलेत ते निपुण झाले. पुढे वणीत बीएपर्यंत शिक्षण पूर्ण करून १९७४ ला ते आकाशवाणी पुणे केंद्रात बासरीवादक म्हणून रुजू झाले. त्यापूर्वी नरेंद्र भिवापूरकर अंध शाळा, अमरावतीचे संस्थापक सदस्य, आनंदवन वरोऱ्यात मुख्याध्यापक, पुण्याजवळ आळंदी येथील जागृती अंध कन्या विद्यालयाचे संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. १९९९ ला त्यांनी स्वरांगण दृष्टिहीन संस्था स्थापन केली. २००७ मध्ये ते आकाशवाणीतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही ते घरी बसले नाहीत. त्यांनी विद्यार्थ्यांना बासरी शिकविणे सुरू केले. विविध ठिकाणी बासरीवादनाचे कार्यक्रम ते घेतात. कोणत्याही शहरात गेले तरी त्या शहरातील एखाद्या शाळेत जाऊन ते विद्यार्थ्यांपुढे बासरी वाजवितात. विद्यार्थ्यांना बे्रल लिपीबद्दल माहिती देतात. अंध व्यक्तींना मदत कशी करावी, याच्या टीप्स देतात. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. एखादा अवयव निकामी झाला आणि कठीण प्रसंग आला की जगण्याची उमेद सोडून देणाऱ्या व्यक्तींनी प्रेरणा घ्यावी, असेच रमेश गुलानींचे व्यक्तिमत्त्व आहे.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक