शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

अंधमित्रही चित्रांतील सौंदर्याचा आस्वाद घेतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 20:14 IST

चित्रकला हे तसे दृश्य माध्यम. प्रत्येकजण पाहूनच कोणत्याही चित्रांचा आस्वाद घेऊ शकतो. पण अंध व्यक्ती या चित्रांमधील सौंदर्याची आस्वाद घेऊ शकेल काय, हा प्रश्न तसा वेदनादायक आणि अस्वस्थ करणाराच आहे. पण खरच असे झाले तर। या वेदनादायक प्रश्नांचे आनंददायक उत्तर प्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस यांनी चित्रकृतींमधून दिले आहे. अंधमित्र चित्रांमधील सौंदर्याचा आस्वाद घेण्यासोबत त्यातील भाव इतरांनाही सांगू शकतील, अशी सुंदर कलाकृती त्यांनी साकार केली आहे. जगातील पहिलाच प्रयोग असलेल्या अप्रतिम अशा चित्रकृतींचे प्रदर्शन शनिवारपासून दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजगातील पहिलाच प्रयोग : चिंतामणी हसबनीस यांच्या चित्रप्रदर्शनाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चित्रकला हे तसे दृश्य माध्यम. प्रत्येकजण पाहूनच कोणत्याही चित्रांचा आस्वाद घेऊ शकतो. पण अंध व्यक्ती या चित्रांमधील सौंदर्याची आस्वाद घेऊ शकेल काय, हा प्रश्न तसा वेदनादायक आणि अस्वस्थ करणाराच आहे. पण खरच असे झाले तर। या वेदनादायक प्रश्नांचे आनंददायक उत्तर प्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस यांनी चित्रकृतींमधून दिले आहे. अंधमित्र चित्रांमधील सौंदर्याचा आस्वाद घेण्यासोबत त्यातील भाव इतरांनाही सांगू शकतील, अशी सुंदर कलाकृती त्यांनी साकार केली आहे. जगातील पहिलाच प्रयोग असलेल्या अप्रतिम अशा चित्रकृतींचे प्रदर्शन शनिवारपासून दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आले आहे.पुण्यात एका सिग्नलवर एक सुंदर मुलगी रस्ता क्रॉस करण्यासाठी उभी होती. डोळस लोक सिग्नल बंद असताना भराभर वाहने काढून पळत होते. ती मुलगी सिग्नल सुरू होण्याची वाट पाहत होती. तिच्या बाजूचे सिग्नल सुरू झाल्यानंतर ती सहजपणे रस्ता ओलांडून जाताना तिच्या हातातील पांढऱ्या काठीमुळे ती अंध असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. हे दृश्य अनेक दिवस हसबनीस यांना अस्वस्थ करीत राहिले. यानंतर त्यांनी दोन वर्ष दृष्टिहीन विद्यार्थी व लोक राहत असलेल्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये राहून त्यांचे निरीक्षण केले व हालचालींचा अभ्यास केला. यानंतरआपली चित्रकला अशा अंधमित्रांसाठी समर्पित करण्याचा निर्धार त्यांनी केला. दमक्षेसां केंद्रात आयोजित चित्रप्रदर्शन म्हणजे त्याचीच परिणती आहे.आज अंध व्यक्ती अनेक क्षेत्रात डोळस व्यक्तींसोबत सामान्यपणे काम करीत आहेत. ब्रेल लिपीच्या मदतीने त्यांनी कामातून प्रत्येक क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण केले आहे. दृष्टी नसूनही डोळसांपेक्षा माणसांची पारख अधिक असते. कारण ते दिसण्यापलिकडचे असणे पाहू शकतात. या मित्रांना त्यांचे चित्र पारखता यावे म्हणून हसबनीस यांनी इंग्रजी, मराठी व हिंदीतील ब्रेल लिपी शिकून घेतली. या सर्व खटाटोपानंतर त्यांनी संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे पहिले चित्र काढले. त्यात त्यांच्या संतूरला खºयाखुºया तारा जोडल्या. सोबत चित्रामध्ये ब्रेल लिपीतील मजकुर कोरला आणि दोन दृष्टिहीन विद्यार्थ्यांना ते दाखविले. या दोन मित्रांनी चित्राला स्पर्श करताच त्यांच्या चेहºयावर हास्य फुलले. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया ऐकून चिंतामणी यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्यांनी ज्या ध्यासाने हा सर्व खटाटोप केला, ते सार्थ ठरल्याचे समाधान लाभले.त्यानंतर त्यांनी अशाप्रकारची अनेक चित्र साकारली. या चित्रांमध्ये ब्रेल लिपीच्या मदतीने मजकूर लिहिला व सोबत प्रतिकात्मक काहीतरी वापरले आहे, ज्यामुळे चित्राला स्पर्शाने अंधमित्र चित्रांचा भावार्थ समजू शकतील व इतरांनाही सांगू शकतील. सुरुवातीला पुण्यात हे प्रदर्शन आयोजित केले. अनेक मान्यवरांकडून मिळालेला प्रतिसाद हा भारावणारा होता. यातील २४ फूट लांब व ६ फूट उंचीचे ‘दि वॉल’ हे पेंटिंग हे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणारे आहे. जगातील पहिला आणि अनोखा प्रयोग नागपुरातील चित्ररसिकांसाठी पर्वणी ठरणारा आहे. इमोशनल डिकोडरचित्रकलेमध्ये बिंदू, रेषा, आकार, रंग, पोत या पाच घटकांचा समावेश असतो. या घटकांसह डोळसांनाही भारावणारे सौंदर्य या चित्रात आहे. मात्र हसबनीस यांनी जोडलेला सहावा घटक म्हणजे इमोशनल डिकोडर म्हणजेच ब्रेल लिपी. चित्रातील ही ब्रेल लिपी पाहणाºयांना आकर्षित तर करतेच, सोबत अंधमित्रांसाठी इमोशनल डिकोडींगचे काम करते. याशिवाय त्यांनी काही महान व्यक्तींच्या चित्रांमध्ये आॅडिओचे उपकरण जोडले आहे. त्यामुळे दृष्टिहीनांनी हा आॅडिओ ऐकला की, चित्र कुणाचे हे त्यांच्या लक्षात येते. अनोखे उदघाटन दृष्टी-स्पर्श आर्ट फाऊंडेशन यांच्यातर्फे नागपूर महानगरपालिका, सक्षम संस्था व एससीझेडसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने हे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी उदघाटनप्रसंगी उपस्थित असलेल्या महापौर नंदा जिचकार व आमदार डॉ. मिलिंद माने यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून स्पर्श करता येईल असा लिखित मजकूर असलेल्या पोर्ट्रेटचे अनावरण करण्यात आले. हा मजकूर विना पाहता वाचण्याचे टास्क त्यांना होते. याप्रसंगी एससीझेडसीसीचे संचालक डॉ. दीपक खिरवाडकर, सक्षमचे अध्यक्ष सुधाकर इंगळे व उमेश खंडारे तसेच फाऊंडेशनचे संस्थापक सदस्य डॉ. प्रकाश जाधव, राजेंद्र कुळकर्णी, मुकुंद बहुलेकर प्रामुख्याने उपस्थित होते. 

 

टॅग्स :artकलाnagpurनागपूर