संत्र्याला मोठा फटका : शेतकरी संकटातकाटोल ३० व कळमेश्वरातील १८ गावांमध्ये नुकसानसोमवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास काटोल शहरात व परिसरात वादळासह पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच गारा पडायला लागल्या. त्यामुळे शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली होती. काटोल व येनवा परिसरातील ३० गावांना या गारपिटीचा फटका बसल्याची माहिती तहसीलदार सचिन यादव यांनी दिली.या गारपिटीमुळे काटोल परिसरातील हातला, डोरली (बु), डोरली (खु), कुकडीपांजरा, पारडी (गोतमारे), ढवळापूर, आजनगाव, ब्रम्हपुरी, मेटपांजरा, मोहगाव (रिठी), लिंगा, सावळी, खंडाळा, कोहळा, अंबाडा, बोरडोह, लिंगा (पारडी), येनवा पििरसरातील येनवा, सोनोली, मेंडकी, सालई (रिठी), इसापूर (बु), इसापूर (खु) यासह अन्य गावांमध्ये आवळ्याच्या आकाराची गारपीट झाली. त्यामुळे मृग बहाराच्या संत्र्याचे प्रचंड नुकसान झाले असून, अंबिया बहार गळाला आहे.काटोल/कळमेश्वर : रविवारी जिल्ह्यातील काही भागांना गारपिटीचा तडाखा बसला असताना सोमवारी सायंकाळी पुन्हा एकदा हिंगणा, काटोल, कळमेश्वर तालुक्यातील काही गावामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. गारांचा आकार आवळ्याएवढा होता. या गारपिटीमुळे संत्र्याचे मोेठे नुकसान झाले असून गहू, हरबऱ्यालाही जबर फटका बसला आहे.
गारपिटीचा डबल तडाखा
By admin | Updated: March 17, 2015 01:46 IST