शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांवर ब्लेडने वार करणाऱ्याला पाच वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:28 IST

दोन चिमुकल्या भाऊ-बहिणीला चॉकलेट खाऊ घालण्यासाठी घरी नेऊन नंतर त्यांच्यावर धारदार ब्लेडने जीवघेणे वार करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने गुरुवारी पाच वर्षे कारावास व १० हजार रुपये दंडाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश आर. आर. पटारे यांनी हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना मानकापूर येथे घडली होती.

ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निर्णय : नागपूरच्या  मानकापूरमधील संतापजनक घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दोन चिमुकल्या भाऊ-बहिणीला चॉकलेट खाऊ घालण्यासाठी घरी नेऊन नंतर त्यांच्यावर धारदार ब्लेडने जीवघेणे वार करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने गुरुवारी पाच वर्षे कारावास व १० हजार रुपये दंडाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश आर. आर. पटारे यांनी हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना मानकापूर येथे घडली होती.विलास भागवत भुजाडे (३३) असे आरोपीचे नाव असून तो गीतानगर, झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी आहे. न्यायालयाने त्याला भादंविच्या कलम ३०७ अंतर्गत पाच वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास तर, कलम ४४८ अंतर्गत एक महिना कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.क्रिश व निहारिका वाकोडे अशी जखमी भाऊ-बहिणीची नावे आहेत. ते त्यांच्या आई-वडिलासह गीतानगर येथील सुनंदा काथवटे यांच्या घरी भाड्याने रहात होते. ५ ऑक्टोबर २०१६ रोजी दुपारी ४ च्या सुमारास आरोपीने क्रिश व निहारिका यांना चॉकलेट खाऊ घालण्यासाठी घरी नेले. दरम्यान, त्याने या चिमुकल्यांचा गळा, चेहरा, मान, हात व पायांवर धारदार ब्लेडने वार केले. चिमुकल्यांचा रडण्याचा आवाज ऐकून त्यांची आई व सुनंदा काथवटे यांनी आरोपीच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांना आरोपी हा मुलांवर ब्लेडने वार करीत असताना दिसून आला. त्यांना पाहून आरोपी घाबरला व त्याने स्वत:चा गळा ब्लेडने कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडीमुळे परिसरातील नागरिक गोळा झाले. त्यानंतर चिमुकल्यांसह आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. सहायक पोलीस निरीक्षक एल. के. हांडे यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. एस. ए. गौळकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Sessions Courtसत्र न्यायालयnagpurनागपूर