शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात ब्लॅक बक हरणाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 10:23 IST

मंगळवारी सकाळी जिल्ह्यातील रामटेकअंतर्गत येणाऱ्या नगरधन शिवारातील एका शेतात ब्लॅक बक हरणाची (काळवीट) गोळी झाडून शिकार झाल्याचे उघडकीस आले आहे. हे हरीण दुर्मिळ प्रजातीचे असून, शेड्यूल १ मध्ये येत असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देहरणाच्या पायाला गोळीची जखम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी सकाळी जिल्ह्यातील रामटेकअंतर्गत येणाऱ्या नगरधन शिवारातील एका शेतात ब्लॅक बक हरणाची (काळवीट) गोळी झाडून शिकार झाल्याचे उघडकीस आले आहे. हे हरीण दुर्मिळ प्रजातीचे असून, शेड्यूल १ मध्ये येत असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे वन विभागात चांगलीच खळबळ माजली आहे.वन अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री नागपुरातील तीन संशयित युवकांना चौकशीसाठी बोलाविले आहे. यात रियाज अहमद अब्दुल वहाब अन्सारी (३५) लष्करीबाग, मोहम्मद आसिफ अन्सारी (३६) मोमीनपुरा, रियाज अहमद मो. जिया (३५) मोमीनपुरा यांचा समावेश आहे. हे तीन युवक घटनेच्या परिसरात फॉर्च्युनर गाडी क्रमांक एमएच ३१-सीएक्स-७००० ने संशयितरीत्या फिरत असल्याचे आढळले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ९.१५ वाजता नगरधन शिवारात दिलीप रंगारी यांच्या शेतातील नाल्याच्या काठावर काळवीट मृतावस्थेत आढळले होते. हरणाच्या पायावरच्या भागात गोळी लागली होती. हरणाच्या शिकार प्रकरणात माहिती मिळाल्यावर सहायक वनसंरक्षक विशाल बोराडे व रामटेक वन परिक्षेत्राचे आरएफओ एस.डी. खोब्रागडे घटनास्थळावर पोहचले. त्यांनी स्थानिक लोकांशी विचारणा केली असता, तीन युवक सोमवारी रात्री गावात फिरताना आढळले. या युवकांना किडनी चोर समजून त्यांना मारपीट करून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपींना विचारपूस केल्यावर सोडून दिले. सकाळी शिवाराजवळ हरणाची शिकार झाल्याची घटना घडल्यामुळे युवकांवर संशय वाढला आहे.

रात्री झाली मारपीटस्थानिक लोकांनी सांगितल्यानुसार, सोमवारी रात्री १० वाजता शिवाराजवळ गाडी लावून सात ते आठ युवक हातात टॉर्च घेऊन काही तरी शोधत होते. त्यांचे संशयास्पद कृत्य बघून हे युवक चोरटे आहेत, असा संशय स्थानिक नागरिकांना आला. त्यांनी मानापूर, उदापूर व नगरधन येथील लोकांना मोबाईलद्वारे कळविले. त्यानंतर मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन तीन युवकांना मारपीट केली. हे बघून अन्य पाच जण पळून गेले. लोकांनी त्यांना मारपीट केल्यानंतर हे युवक हरीण पकडण्यासाठी आल्याची त्यांनी माहिती दिल्याचे समजते.

टॅग्स :Crimeगुन्हा